lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > युको बँकेचे शेअर्स घसरले

युको बँकेचे शेअर्स घसरले

युको बँकेचे फॉरेन्सिक आॅडिट करण्याचे आदेश दिल्याने या बँकेचे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले.

By admin | Published: August 28, 2014 02:58 AM2014-08-28T02:58:45+5:302014-08-28T02:58:45+5:30

युको बँकेचे फॉरेन्सिक आॅडिट करण्याचे आदेश दिल्याने या बँकेचे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले.

Yuko Bank's shares plummeted | युको बँकेचे शेअर्स घसरले

युको बँकेचे शेअर्स घसरले

मुंबई : युको बँकेचे फॉरेन्सिक आॅडिट करण्याचे आदेश दिल्याने या बँकेचे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले. यामुळे युको बँकेचे बाजार भांडवल ३,१८६.५३ कोटी रुपयांनी घटले. मुंबई शेअर बाजारात युको बँकेचे शेअर्स ८.२४ टक्क्यांनी घसरत प्रति शेअर्सचा भाव ९०.२५ रुपयांवर आला.
राष्ट्रीय शेअर बाजारातही या शेअर्सचा भाव ८९.६० रुपयांवर आला. काही थकीत खात्यांची फॉरेन्सिक चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अलीकडेच सिंडिकेट बँकेचे चेअरमन एस. के. जैन यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर युको बँकेचे फॉरेन्सिक आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बँकेतील थकीत कर्जाचा आकडा जूनपर्यंत ३,३४४.०२ कोटी रुपये होता.

Web Title: Yuko Bank's shares plummeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.