lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > VIDEO: तब्बल १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा!

VIDEO: तब्बल १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा!

पवन देशपांडे / ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 22 - सेल्फीमय झालेल्या तरुणाईसाठी आता आणखी एक खूशखबर आहे. सेल्फी ...

By admin | Published: March 22, 2017 05:18 PM2017-03-22T17:18:39+5:302017-03-22T17:18:39+5:30

पवन देशपांडे / ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 22 - सेल्फीमय झालेल्या तरुणाईसाठी आता आणखी एक खूशखबर आहे. सेल्फी ...

VIDEO: 16 megapixel selfie camera! | VIDEO: तब्बल १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा!

VIDEO: तब्बल १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा!

पवन देशपांडे / ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - सेल्फीमय झालेल्या तरुणाईसाठी आता आणखी एक खूशखबर आहे. सेल्फी चांगला, क्लिअर अन् अ‍ॅट्रॅक्टिव्ह यावा यासाठी जिओनी कंपनीने तब्बल १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असलेला जिओनी ए१ हा फोन लाँच केला आहे. एवढेच नाही तर या कॅमेऱ्यासोबत फ्रंट फ्लॅशही असणार आहे आणि मोबाइलला तब्बल 4010 मिलीअँम्पिअर क्षमतेची बॅटरीही कंपनीने दिली आहे. 
 
हा फोन लाँच करतानाच कंपनीने ‘सेल्फिस्तान’ नावाची आभासी दुनियाही तरुणाईसाठी तयार केली असून, या सेल्फिस्तानच्या माध्यमातून सर्वांना सेल्फीच्या वेगवेगळ्या टिप्सही देण्यात येणार आहे. 
 
मराठी वेबजगतातील पहिल्या सेल्फीगप्पा!
जिओनी नावाची चीनमधील मोबाइल कंपनी. सध्या या कंपनीनं मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याला फ्लॅश जोडून नवीन ट्रेंड बाजारात आणला. आता याच कंपनीने सेल्फीमय पिढीसाठी नवीन फोन लाँच केला पण यासोबतच एक नवीन कन्सेप्टही आणली. ती म्हणजे सेल्फिस्तान. सेल्फिस्तानच्या दुनियेत तरुणाईला रंगवणाऱ्या जिओनीचे भारतातील सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अरविंद वोहरा यांच्या मराठी वेबजगतातील पहिल्या सेल्फीगप्पा... 
{{{{dailymotion_video_id####x844vfc}}}}

 
सुपर बॅटरी 
जिओनीने ए1 या फोनला 4010 मिलीअ‍ॅम्पिअर क्षमतेची बॅटरी तर दिलीच आहे शिवाय दीर्घकाळ चालणारी ही बॅटरी केवळ दोन तासांमध्ये 100 टक्के चार्ज होते असाही दावा केला आहे़ एवढेच नव्हे तर केवळ 300 सेकंद म्हणजे पाच मिनीटे फोन चार्ज केल्यास दोन तास मोबाइलवर बोलण्यास पुरेल एवढा बॅटरी बॅकअप मिळत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 
 
असा आहे जिओनी ए1 -
CPU : MT6755(Octa Core 2.0GHz)
OS : Android 7.0
Network : 2G, 3G, 4G, LTE 
Dimension : 154.5*76.5*8.3mm
Weight : 183 gm
Memory : RAM: 4GB; ROM:64GB
Expendable up to 256GB
Display Size: 13.97 cm (5.5)
Display Resolution: 1920*1080
Screen Type: in-cell
Camera Rear : 13MP AF F2.0 SONY IMX 258
Camera Front : 16MP FF F2.0
Battery : 4010mAh
Dual SIM Dual Standby(Hybrid slot)
Wi-Fi, Bluetooth, Micro USB, GPS
 
 

Web Title: VIDEO: 16 megapixel selfie camera!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.