lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुट्ट्यांतही प्राप्तिकर कार्यालये सुरूच!, ३१ मार्चपूर्वी भरा विलंबित प्राप्तिकर विवरणपत्रे

सुट्ट्यांतही प्राप्तिकर कार्यालये सुरूच!, ३१ मार्चपूर्वी भरा विलंबित प्राप्तिकर विवरणपत्रे

सर्वसामान्यांना प्राप्तिकर विवरणपत्रे भरता यावीत, यासाठी २९, ३० आणि ३१ मार्च या दिवशी सुट्ट्या असल्या, तरीही प्राप्तिकर कार्यालये आणि प्राप्तिकर सेवा केंद्रे उघडी राहणार आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:53 AM2018-03-28T02:53:10+5:302018-03-28T02:53:10+5:30

सर्वसामान्यांना प्राप्तिकर विवरणपत्रे भरता यावीत, यासाठी २९, ३० आणि ३१ मार्च या दिवशी सुट्ट्या असल्या, तरीही प्राप्तिकर कार्यालये आणि प्राप्तिकर सेवा केंद्रे उघडी राहणार आहेत.

Vacant Income Tax return details before 31st March | सुट्ट्यांतही प्राप्तिकर कार्यालये सुरूच!, ३१ मार्चपूर्वी भरा विलंबित प्राप्तिकर विवरणपत्रे

सुट्ट्यांतही प्राप्तिकर कार्यालये सुरूच!, ३१ मार्चपूर्वी भरा विलंबित प्राप्तिकर विवरणपत्रे

नवी दिल्ली/मुंबई : सर्वसामान्यांना प्राप्तिकर विवरणपत्रे भरता यावीत, यासाठी २९, ३० आणि ३१ मार्च या दिवशी सुट्ट्या असल्या, तरीही प्राप्तिकर कार्यालये आणि प्राप्तिकर सेवा केंद्रे उघडी राहणार आहेत.
२०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षाचे विलंबित प्राप्तिकर विवरणपत्र आणि २०१६-१७ या आढावा वर्षाचे सुधारित विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०१८ ही आहे. बँक ग्राहकांच्या सोयीसाठी २९ ते ३१ मार्च या तीन दिवसांत भारतातील सर्व प्राप्तिकर कार्यालये सुरू राहतील, असे वित्त मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
२९ मार्च आणि ३० मार्च रोजी अनुक्रमे महावीर जयंती आणि गुड फ्रायडेनिमित्त सुट्टी आहे. ३१ मार्च हा वित्त वर्षाचा शेवटचा दिवस आहे. अशा सलग सुट्ट्या असल्या, तरी प्राप्तिकर कार्यालये आणि प्राप्तिकर सेवा केंद्रे सुरू राहतील.

३१ मार्चपूर्वी भरा विलंबित प्राप्तिकर विवरणपत्रे
चालू वित्त वर्षासाठी म्हणजेच १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या काळातील उत्पन्नासाठी प्राप्तिकर विवरणपत्र न भरलेल्यांना ते भरण्याची ३१ मार्चपर्यंतच शेवटची संधी आहे. २०१५-१६ या वित्त वर्षाचे विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदतही ३१ मार्च हीच आहे.
विवरणपत्रे दाखल करण्याबाबत प्राप्तिकर खात्याने अधिक कडक भूमिका घेतली आहे. ज्यांनी करभरणा केलेला नाही, अशा करदात्यांना खटले भरण्याची ताकीद देणाऱ्या नोटिसाही बजावण्यात येत आहेत.
वित्त कायदा २०१६ च्या कलम १३९ (४) नुसार उशिराने विवरणपत्र भरण्याचे नियम बदलण्यात आले आहेत. वित्त वर्षाच्या शेवटच्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आत विवरणपत्र भरणे आता बंधनकारक आहे. पूर्वी ही मुदत २४ महिने होती.

Web Title: Vacant Income Tax return details before 31st March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर