lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘सायबर सिक्युरिटी’साठी उद्योजक एकत्र

‘सायबर सिक्युरिटी’साठी उद्योजक एकत्र

डिजिटलायझेशनच्या जगात ‘सायबर सिक्युरिटी’ हा प्रत्येकासाठीच चिंतेचा विषय झाला आहे. अशावेळी या विषयावर चर्चेसाठी देशभरातील उद्योजक एकत्र येत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 04:28 AM2017-11-07T04:28:59+5:302017-11-07T04:29:12+5:30

डिजिटलायझेशनच्या जगात ‘सायबर सिक्युरिटी’ हा प्रत्येकासाठीच चिंतेचा विषय झाला आहे. अशावेळी या विषयावर चर्चेसाठी देशभरातील उद्योजक एकत्र येत आहेत.

Together with entrepreneurs for 'cyber security' | ‘सायबर सिक्युरिटी’साठी उद्योजक एकत्र

‘सायबर सिक्युरिटी’साठी उद्योजक एकत्र

मुंबई : डिजिटलायझेशनच्या जगात ‘सायबर सिक्युरिटी’ हा प्रत्येकासाठीच चिंतेचा विषय झाला आहे. अशावेळी या विषयावर चर्चेसाठी देशभरातील उद्योजक एकत्र येत आहेत. भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयने यासंबंधी गुरुवार, ९ नोव्हेंबरला विशेष सेमिनार मुंबईत आयोजित केला आहे.
जीएसटीएन पोर्टलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद पांडेदेखील त्यात सहभागी होणार आहेत. जीएसटीएन पोर्टल वारंवार हँग होत असल्यासंबंधी त्यांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक व सायबर सेक्युरिटी स्थायी समितीच्या अध्यक्षा मीना हेमचंद्र, अ‍ॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा यांच्यासह स्टेट बँक, आयडीएफसी बँक, बीएसई, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, एनएसई, इंडसइंड बँक, युनियन बँक, अ‍ॅप्टेक, एचडीएफसी बँक, एचएसबीसी अशा सर्वच
वित्तीय संस्थांच्या सायबर व तांत्रिक विभागाचे प्रमुख या सेमिनारमध्ये दिशा देणार आहेत.

Web Title: Together with entrepreneurs for 'cyber security'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.