lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विक्रीच्या माऱ्यामध्येही निर्देशांकांची वाढ सुरूच

विक्रीच्या माऱ्यामध्येही निर्देशांकांची वाढ सुरूच

अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धाच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण, आंतरराष्टÑीय बाजारामधील खनिज तेलाच्या वाढत्या दराची चिंता याचे पडसाद भारतामधील शेअर बाजारांमध्येही बघावयास मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 03:34 AM2018-06-25T03:34:02+5:302018-06-25T03:34:04+5:30

अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धाच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण, आंतरराष्टÑीय बाजारामधील खनिज तेलाच्या वाढत्या दराची चिंता याचे पडसाद भारतामधील शेअर बाजारांमध्येही बघावयास मिळाले

There is also an increase in the index in sales | विक्रीच्या माऱ्यामध्येही निर्देशांकांची वाढ सुरूच

विक्रीच्या माऱ्यामध्येही निर्देशांकांची वाढ सुरूच

प्रसाद गो. जोशी
अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धाच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण, आंतरराष्टÑीय बाजारामधील खनिज तेलाच्या वाढत्या दराची चिंता याचे पडसाद भारतामधील शेअर बाजारांमध्येही बघावयास मिळाले. परकीय वित्तसंस्थांसह येथेही विक्रीचा मारा झाला. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या खरेदीमुळे निर्देशांकांना आपली साप्ताहिक वाढ कायम राखता आली.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५,६९८.४३ अंशांवर खुला झाला. त्यानंतर, सप्ताहामध्ये तो ३५,७४१.२६ ते ३५,२४९.०६ अंशांदरम्यान हेलकावत राहिला. सप्ताहाच्या अखेरीस तो ३५,६८९.६० अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये अवघी ६७.४६ अंश अशी अल्पशी वाढ झाली. सलग पाचव्या सप्ताहामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झालेली दिसून
आली आहे.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) अवघ्या ४.१५ अंशांनी वाढून १०,८२१.८५ अंशांवर बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक मात्र घसरलेले दिसून आले. मिडकॅप निर्देशांकामध्ये १६१.५९ अंशांची घट होऊन तो १५८३९.६१ अंशांवर बंद झाला, तर स्मॉलकॅपमध्ये ४२१.३२ अंशांची घसरण झाली. सप्ताहाच्या अखेरीस तो १६,५३९.८४ अंशांवर
बंद झाला.
अमेरिका आणि भारत, तसेच चीन यांच्यामध्ये व्यापारयुद्ध भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिकेने अनेक देशांमधून आयात होणाºया उत्पादनांवर कर लादला आहे.
याचा परिणाम म्हणून युरोपीयन देशांनी काही अमेरिकन वस्तूंवर कर लादला आहे. चीन आणि भारतानेही इशारा दिल्याने व्यापारयुद्ध भडकण्याची भीती आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारांवर विक्रीचे दडपण आले. भारतीय बाजारांमध्येही परकीय वित्तसंस्था आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली. सप्ताहाच्या अखेरीस खरेदीच्या पाठिंब्याने निर्देशांक
वाढले.

Web Title: There is also an increase in the index in sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.