lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुगंध देणारे उत्तर प्रदेशातील कनोज गाव जीएसटीमुळे कोमेजले

सुगंध देणारे उत्तर प्रदेशातील कनोज गाव जीएसटीमुळे कोमेजले

उत्तर प्रदेशातील कनोज हे जगाला सुगंधित अत्तरे पुरवणारे गाव. फुलांच्या सुगंधाचा अर्क काढून तºहेतºहेची अत्तरे अनेक वर्षांपासून इथे बनवली जातात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:51 AM2017-10-06T03:51:23+5:302017-10-06T03:51:41+5:30

उत्तर प्रदेशातील कनोज हे जगाला सुगंधित अत्तरे पुरवणारे गाव. फुलांच्या सुगंधाचा अर्क काढून तºहेतºहेची अत्तरे अनेक वर्षांपासून इथे बनवली जातात.

The sweet-smelling Kanoj Gaon in Uttar Pradesh caused by GST | सुगंध देणारे उत्तर प्रदेशातील कनोज गाव जीएसटीमुळे कोमेजले

सुगंध देणारे उत्तर प्रदेशातील कनोज गाव जीएसटीमुळे कोमेजले

सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कनोज हे जगाला सुगंधित अत्तरे पुरवणारे गाव. फुलांच्या सुगंधाचा अर्क काढून तºहेतºहेची अत्तरे अनेक वर्षांपासून इथे बनवली जातात. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली आणि हे गाव अक्षरश: कोमेजले. खास सुगंधी अत्तरांसाठी फुलांची शेती करणारे तमाम शेतकरी जीएसटीमुळे हवालदिल आहेत. कनोजच्या ८0 टक्के लोकसंख्येचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अर्थकारण अत्तरे बनवणाºया ३00 कारखान्यांवर अवलंबून आहे. या कारखान्यांवर काळोख पसरलाय.
अत्तर व्यवसायाचे महत्त्वाचे घटक म्हणजे तºहेतºहेची सुगंधी फुले आणि त्यांची नाजूक शेती करणारे कुशल शेतकरी. जीएसटीपूर्वी शेतकºयांनी प्रेमाने वाढवलेल्या फुलांना किमान ९0 रुपये प्रतिकिलो भाव मिळायचा. जीएसटी लागू झाल्यानंतर हा भाव ३0 ते ३२ रुपयांवर आला. गुलाबपाणी व गुलकंदावरही जीएसटी लागू झाला. त्यामुळे शेतकºयांच्या फुलांचे भाव आणखी कोसळले. फुलांच्या नाजूक शेतीसाठी शेतमजुरांना किमान ३00 रुपये रोज मजुरी द्यावी लागते. शेतकºयांना उत्पादनखर्च परवडेनासा झाल्यामुळे फुलशेती संकटात आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
कनोजजवळच्या २00 हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रावर गुलाब, चमेली, बेला, दमिश्क, मेंदी इत्यादींची शेती होत होती. आज तेथे अवकळा पसरली आहे. अत्तर उद्योगाशी संबंधित फुले व अन्य सामग्री उत्तराखंडातल्या डोंगराळ प्रदेशातून येथे येते. यूपीए सरकारच्या कालखंडात गुलकंद, गुलाबपाणी, केवड्याचे पाणी यासारखी अत्तर उद्योगाशी संबंधित पूरक उत्पादने करमुक्त होती.
आता या सर्व उत्पादनांवर २८ टक्के वस्तू व सेवा कर लागू झाला आहे. कनोजच्या अत्तर उत्पादक असोसिएशनचे एक शिष्टमंडळ लवकरच अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेणार आहे. या असोसिएशनचे एक पदाधिकारी म्हणाले की, अत्तर उद्योगाच्या उत्पादनांवर पूर्वी ५ टक्के कर होता. हा दर तसा योग्य होता. जीएसटी लागू झाल्याचा मोठा फटका कनोजच्या ३00 अत्तर कारखान्यांना बसला आहे. सरकारने लवकरात लवकर याचा पुनर्विचार केला नाही तर जगाला सुगंधित करणारा हा व्यवसाय लवकरच काळाच्या पडद्याआड जाईल.

Web Title: The sweet-smelling Kanoj Gaon in Uttar Pradesh caused by GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी