lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजाराला औद्योगिक उत्पादनाने तारले; निर्देशांक वाढले

शेअर बाजाराला औद्योगिक उत्पादनाने तारले; निर्देशांक वाढले

जुलै महिन्यात वाढलेले औद्योगिक उत्पादन, सप्ताहात आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये असलेले चांगले वातावरण आणि बाजारात खरेदीसाठी उत्सुक खरेदीदार असल्यामुळे बाजार सप्ताहभर तेजीत राहिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:47 AM2017-09-18T00:47:04+5:302017-09-18T00:48:25+5:30

जुलै महिन्यात वाढलेले औद्योगिक उत्पादन, सप्ताहात आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये असलेले चांगले वातावरण आणि बाजारात खरेदीसाठी उत्सुक खरेदीदार असल्यामुळे बाजार सप्ताहभर तेजीत राहिला.

Stock market saved by industrial production; Index gained | शेअर बाजाराला औद्योगिक उत्पादनाने तारले; निर्देशांक वाढले

शेअर बाजाराला औद्योगिक उत्पादनाने तारले; निर्देशांक वाढले

-प्रसाद गो. जोशी
जुलै महिन्यात वाढलेले औद्योगिक उत्पादन, सप्ताहात आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये असलेले चांगले वातावरण आणि बाजारात खरेदीसाठी उत्सुक खरेदीदार असल्यामुळे बाजार सप्ताहभर तेजीत राहिला. सप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेली अमेरिका आणि चीनची आर्थिक परिस्थिती आणि निर्बंधांनंतरही उत्तर कोरियाने केलेली क्षेपणास्त्र चाचणी, यामुळे आलेल्या नकारात्मकतेचे परिणाम आगामी सप्ताहात दिसू शकतील.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात तेजीचे वातावरण दिसून आले. संवेदनशील निर्देशांक दररोज वाढीव पातळीवर बंद होत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो गत वेळच्या बंद निर्देशांकापेक्षा ५८५.०९ अंशांनी वाढून ३२२७२.६१ अंशांवर बंद झाला. बाजारात झालेली वाढ ही सुमारे एक टक्का एवढी राहिली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सप्ताहामध्ये दहा हजार अंशांची पातळी ओलांडू शकला. मागील सप्ताहापेक्षा १५०.६० अंशांची वाढ घेऊन, हा निर्देशांक १००८५.४० अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहात तो या टप्प्याच्या अगदी निकट होता.
जून महिन्यापेक्षा जुलैमध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये झालेली वाढ ही बाजाराला उभारी देणारी ठरली. कांदा आणि भाजीपाल्याच्या दरामध्ये झालेल्या वाढीमुळे चलनवाढीचा दर उंचावला असला, तरी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. जीएसटीबाबतचा संभ्रम, भारतीय बाजारपेठेकडून कमी परतावा मिळण्याची शक्यता, यामुळे परकीय वित्तसंस्थांनी बाजारात विक्री चालूच ठेवली आहे. सप्टेंबरच्या पंधरा दिवसांमध्ये या संस्थांनी बाजारातून सुमारे ३००० कोटी रुपये काढून घेतले. मात्र, मोठ्या प्रमाणावर बाजारात खरेदीदार असल्याने त्याचा फटका बसला नाही. सप्ताहाच्या अखेरीस उत्तर कोरियाने पुन्हा सोडलेल्या क्षेपणास्त्राने राजकीय चिंता वाढविली आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीच्या अहवालाने तेथील व्याजदर कमी होण्याची शक्यता धूसर बनली असून, कडक आर्थिक धोरण राबविले जाणे अपेक्षित आहे.

परकीय गंगाजळी ४०० अब्ज डॉलरपार
भारताची परकीय चलन गंगाजळी प्रथमच ४०० अब्ज डॉलरचा टप्पा पार करून गेली आहे. ८ सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये गंगाजळीत २.६ अब्ज डॉलरची वाढ होऊन, ती ४००.७२७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. देशाची सुमारे वर्षभराची आयात करण्यासाठी ही गंगाजळी पुरेशी आहे.
चालू वर्षामध्ये डेट आणि इक्विटीमध्ये होत असलेली परकीय संस्थात्मक गुंतवणुकदारांची जोरदार गुंतवणूक आणि डॉलरचे कमी होणारे मूल्य, यामुळे ही वाढ झाली आहे. सन २०१७ मध्ये स्वित्झर्लंड आणि चीननंतर भारत परकीय चलन गंगाजळीच्या वाढीत जगात तिसºया क्रमांकावर आहे.
३०० अब्ज डॉलरपासून ४०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याला, सुमारे दशकभराचा काळ लागला हे विशेष. एप्रिल २००७मध्ये गंगाजळीने
२०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठला. त्यानंतर, अवघ्या ११ महिन्यांत
म्हणजे फेब्रुवारी २००८मध्ये गंगाजळीतील रक्कम ३०० अब्ज डॉलरपार झाली होती.

Web Title: Stock market saved by industrial production; Index gained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.