lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पॅनकार्ड क्लबची मालमत्ता ‘सेबी’ने सोडवली

पॅनकार्ड क्लबची मालमत्ता ‘सेबी’ने सोडवली

पॅनकार्ड क्लबच्या गोव्यातील मालमत्तेवरील बेकायदेशीर ताबा सेबीने सोडवला. वार्का येथे क्लबच्या मालकांनी रिसॉर्ट खरेदी केले होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:43 AM2018-06-15T01:43:45+5:302018-06-15T01:43:45+5:30

पॅनकार्ड क्लबच्या गोव्यातील मालमत्तेवरील बेकायदेशीर ताबा सेबीने सोडवला. वार्का येथे क्लबच्या मालकांनी रिसॉर्ट खरेदी केले होते.

Securities of PAN Card were resolved by SEBI | पॅनकार्ड क्लबची मालमत्ता ‘सेबी’ने सोडवली

पॅनकार्ड क्लबची मालमत्ता ‘सेबी’ने सोडवली

मुंबई : पॅनकार्ड क्लबच्या गोव्यातील मालमत्तेवरील बेकायदेशीर ताबा सेबीने सोडवला. वार्का येथे क्लबच्या मालकांनी रिसॉर्ट खरेदी केले होते.
घोटाळा उघडकीस आल्यानंतर ‘सेबी’ने ही मालमत्ता जप्त केली. त्यानंतरही कंपनीने सप्टेंबर २०१७ ला हे रिसॉर्ट मेसर्स सोल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सला लीजवर दिले. त्यामुळे सेबीने मार्च २०१८ ला या मालमत्तेचा ५.२१ कोटी रुपयांना लिलाव केला. पण सोल टूर्सने लिलावाद्वारे ही मालमत्ता खरेदी करणाऱ्या रामनिवास अग्रवाल व अन्य खरेदीदारांना मालमत्तेचा ताबा देण्यास नकार दिला. ‘सेबी’च्या नोटिसीलाही सोल टूर्सने योग्य उत्तर दिले नाही. अखेर ‘सेबी’च्या अधिकाºयांनी गोव्यात जाऊन ही मालमत्ता खरेदीदारांना मिळवून दिली. पॅनकार्ड क्लबच्या मालकांनी जशी ५० लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केली तशीच सोल टूर्सचीही फसवणूक केल्याचे यातून समोर आले आहे.

Web Title: Securities of PAN Card were resolved by SEBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.