lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > १३ महिन्यांच्या नीचांकावर रुपया

१३ महिन्यांच्या नीचांकावर रुपया

आयातदार आणि काही बँकांकडून डॉलरला खूपच मोठी मागणी, तेलाचे घसरलेले दर आणि स्टॉक मार्केटमधील गोंधळ यामुळे मंगळवारी रुपया एका डॉलरला १३ महिन्यांतील नीचांकावर (६३.५३) गेला.

By admin | Published: December 17, 2014 12:55 AM2014-12-17T00:55:50+5:302014-12-17T00:55:50+5:30

आयातदार आणि काही बँकांकडून डॉलरला खूपच मोठी मागणी, तेलाचे घसरलेले दर आणि स्टॉक मार्केटमधील गोंधळ यामुळे मंगळवारी रुपया एका डॉलरला १३ महिन्यांतील नीचांकावर (६३.५३) गेला.

Rupee at 13-month low | १३ महिन्यांच्या नीचांकावर रुपया

१३ महिन्यांच्या नीचांकावर रुपया

मुंबई : आयातदार आणि काही बँकांकडून डॉलरला खूपच मोठी मागणी, तेलाचे घसरलेले दर आणि स्टॉक मार्केटमधील गोंधळ यामुळे मंगळवारी रुपया एका डॉलरला १३ महिन्यांतील नीचांकावर (६३.५३) गेला.
विदेशी चलन बाजारातील व्यावसायिकांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक कदाचित बाजारात हस्तक्षेप करील; परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत जो डॉलर विकला जातो त्यावर काही परिणाम अपेक्षित नाही. रुपया बहुतेक उद्या (बुधवारी) ६४ रुपयांची मर्यादा ओलांडेल, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले. इंटरबँक फॉरीन एक्स्चेंज मार्केटमध्ये (फोरेक्स) रुपयाची सुरुवात डॉलरच्या तुलनेत ६३.५३ अशी झाली. डॉलर बाजारातून बाहेर जातच राहिल्यामुळे रुपया आणखी (६३.५९) खाली आला व ६३.५३ वर (०.९४ टक्के) स्थिरावला. गेल्या चार महिन्यांत रुपयाचे हे सर्वांत जास्त झालेले नुकसान आहे. रुपया सोमवारी ६५ पैशांनी कोसळला होता. रुपया जर याच पायरीवर दीर्घकाळ राहिला, तर सरकारच्या दृष्टीने ही परिस्थिती त्रासदायक असेल, असे वाणिज्य सचिव राजीव खेर यांनी सांगितले. क्रूड तेलाच्या बॅरलची किंमत ६० डॉलरच्या (अमेरिकन) खाली आल्यामुळे विदेशातील अर्थ बाजारही दुबळा झाला.

 

Web Title: Rupee at 13-month low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.