lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिगर बॅँकिंग वित्तीय कंपन्यांच्या नियमांचा आढावा घेणार

बिगर बॅँकिंग वित्तीय कंपन्यांच्या नियमांचा आढावा घेणार

कंपन्यांच्या अन्य कार्याची माहितीही जमा करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय रिझव्र्ह बॅँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी केली.

By admin | Published: June 20, 2014 12:18 AM2014-06-20T00:18:31+5:302014-06-20T00:18:31+5:30

कंपन्यांच्या अन्य कार्याची माहितीही जमा करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय रिझव्र्ह बॅँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी केली.

To review the rules of non-banking financial companies | बिगर बॅँकिंग वित्तीय कंपन्यांच्या नियमांचा आढावा घेणार

बिगर बॅँकिंग वित्तीय कंपन्यांच्या नियमांचा आढावा घेणार

>मुंबई : देशातील बिगर बॅँकिंग वित्तीय कंपन्यांबाबतच्या नियमांचा भारतीय रिझव्र्ह बॅँक आढावा घेत असून या कंपन्यांच्या अन्य कार्याची माहितीही जमा करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय रिझव्र्ह बॅँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी केली.
युनायटेड रायटर्स असोसिएशन आणि फ्रॅँक मोरेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 33व्या फ्रॅँक मोरेस स्मृती व्याखानानंतर पत्रकारांशी बोलताना गांधी यांनी ही घोषणा केली. 
सरकारबरोबर चर्चा करून आम्ही या कंपन्यांबाबतचे नियम अधिक कडक करण्यासाठी कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बिगर बॅँकिंग वित्तीय कंपन्या या बॅँकांच्या प्रतिस्पर्धी नसून त्या बॅँकांना पूरक अशी भूमिका बजावत असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले. या कंपन्यांमुळे मध्यम आणि लघुउद्योगांना सहजतेने कर्ज उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी काही कंपन्यांबाबत गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्याने याबाबत रिझव्र्ह बॅँकेने नियम कडक करण्याचे काम हाती घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
याआधी नचिकेत मोर समितीने याबाबत केलेल्या शिफारशींबाबतही विचार केला जात असून त्यामधील योग्य शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले. 
सध्या बिगर बॅँकिंग वित्तीय कंपन्यांचे नियंत्रण आणि नियमन करण्याची जबाबदारी वेगवेगळ्या संस्था आणि नियंत्रकांच्या हाती असल्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती आहे. हा गोंधळ कमी व्हावा आणि नियंत्रकाचे काम अधिक स्पष्ट आणि चोख व्हावे, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे गांधी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
- बिगर बॅँकिं ग वित्तीय संस्था या आर्थिक मध्यस्थ म्हणून कार्यरत असतात. बचत आणि गुंतवणूक एकत्रितपणो व्हावी यासाठी त्या प्रयत्नशील असतात. 
 
- बिगर बॅँकिंग वित्तीय संस्था या बॅँकांच्या प्रतिस्पर्धी नसून त्या बॅँकांना पूरक अशी भूमिका बजावित असतात. 
- बिगर बॅँकिंग वित्तीय संस्थांचे आर्थिक स्थैर्य आणि ग्राहक आणि गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी भारतीय रिझव्र्ह बॅँक प्रयत्नशील असते.

Web Title: To review the rules of non-banking financial companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.