lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > फसवणुकीची प्रकरणे दाखल करण्यासाठी नोंदणी कार्यालय

फसवणुकीची प्रकरणे दाखल करण्यासाठी नोंदणी कार्यालय

फसवणुकीच्या प्रकरणात खटले दाखल करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या रचनेला अंतिम रूप दिले असून लवकरच याबाबत

By admin | Published: March 29, 2015 11:23 PM2015-03-29T23:23:37+5:302015-03-29T23:23:37+5:30

फसवणुकीच्या प्रकरणात खटले दाखल करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या रचनेला अंतिम रूप दिले असून लवकरच याबाबत

Registration office to file cheating cases | फसवणुकीची प्रकरणे दाखल करण्यासाठी नोंदणी कार्यालय

फसवणुकीची प्रकरणे दाखल करण्यासाठी नोंदणी कार्यालय

नवी दिल्ली : फसवणुकीच्या प्रकरणात खटले दाखल करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या रचनेला अंतिम रूप दिले असून लवकरच याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. या कार्यालयामुळे कर्जफेड न करणाऱ्यांच्या माहितीची देवाणघेवाण केली जाईल, पर्यायाने बँकांना बुडीत कर्जाचा प्रश्न सोडविण्यास मदत मिळेल.
बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंदडा यांनी सांगितले की हा विभाग रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली काम करील व बँकांना फसविणाऱ्या संस्थांसंदर्भातील माहितीची तातडीने देवाणघेवाण करील. सध्या बँका त्यांच्या कर्जाची परतफेड न करणाऱ्यांची नावे वृत्तपत्रांत व संकेतस्थळावर प्रकाशित करीत आहेत. हे कार्यालय कार्यान्वित झाल्यावर ही सगळी माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. बँक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या माहितीची खातरजमा या कार्यालयाच्या माध्यमातून करून घेऊ शकेल.

Web Title: Registration office to file cheating cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.