lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोनालिका ट्रॅक्टर्सचा विक्रम, सहा महिन्यांतच ५0 हजारांचा आकडा पार

सोनालिका ट्रॅक्टर्सचा विक्रम, सहा महिन्यांतच ५0 हजारांचा आकडा पार

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे ५0 हजार २ सोनालिका ट्रॅक्टर्स विकले गेले असून, हा मोठाच विक्रम मानला जात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:32 AM2017-10-05T04:32:16+5:302017-10-05T04:32:24+5:30

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे ५0 हजार २ सोनालिका ट्रॅक्टर्स विकले गेले असून, हा मोठाच विक्रम मानला जात आहे.

Record of Sonalika tractors, crossing 50 thousand mark in six months | सोनालिका ट्रॅक्टर्सचा विक्रम, सहा महिन्यांतच ५0 हजारांचा आकडा पार

सोनालिका ट्रॅक्टर्सचा विक्रम, सहा महिन्यांतच ५0 हजारांचा आकडा पार

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे ५0 हजार २ सोनालिका ट्रॅक्टर्स विकले गेले असून, हा मोठाच विक्रम मानला जात आहे. त्यामुळे कमी काळात सर्वाधिक ट्रॅक्टर्स विकणारी कंपनी म्हणून आयटीएलचा उल्लेख केला जात आहे. ही वाढ ५७.६ टक्के इतकी आहे.
सप्टेंबर महिन्यातच १३ हजार ८३0 सोनालिका ट्रॅक्टर्स भारतात व परदेशांत विकले गेले. निर्यात झालेल्या ट्रॅक्टर्सची संख्या १७७४ आहे. याचाच अर्थ देशामध्ये या काळात १२ हजार ५६ लोकांनी सोनालिका ट्रॅक्टर्सची खरेदी केली. कंपनीचे कार्यकारी संचालक रमन मित्तल यांनी सांगितले की, या वर्षभरात वेगवेगळ्या एचपी श्रेणीतील ट्रॅक्टर्स बाजारात आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या ट्रॅक्टर्सवर देशातील शेतकरी समाधानीच नव्हे, तर आनंदी आहेत, असे आढळून
आले असून, शेतकºयांचे उत्पादन व उत्पन्न वाढावे, असाच आमचा उद्देश आहे. शेतकºयांना साह्यभूत ठरतील, अशा प्रकारचे बदल करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्याचा परिणाम म्हणूनच सोनालिका ट्रॅक्टर्सची विक्री वाढली आहे, असे आम्ही अभिमानाने
सांगू शकतो.

Web Title: Record of Sonalika tractors, crossing 50 thousand mark in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.