lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नीरव मोदीचा प्रस्ताव पीएनबीने फेटाळला

नीरव मोदीचा प्रस्ताव पीएनबीने फेटाळला

१२,७०० कोटी रुपयांचा घोटाळा करून विदेशात फरार झालेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी याचा तडजोडीचा प्रस्ताव पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फेटाळून लावला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:42 AM2018-03-14T01:42:39+5:302018-03-14T01:42:39+5:30

१२,७०० कोटी रुपयांचा घोटाळा करून विदेशात फरार झालेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी याचा तडजोडीचा प्रस्ताव पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फेटाळून लावला आहे.

PNB rejects Neerav Modi's proposal | नीरव मोदीचा प्रस्ताव पीएनबीने फेटाळला

नीरव मोदीचा प्रस्ताव पीएनबीने फेटाळला

मुंबई : १२,७०० कोटी रुपयांचा घोटाळा करून विदेशात फरार झालेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी याचा तडजोडीचा प्रस्ताव पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फेटाळून लावला आहे. आमच्याच पैशावर तुमचा ब्रँड उभा राहिला आहे, हे विसरू नका. थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम ताबडतोब भरा, असे बँकेने या पत्रात म्हटले आहे.
नीरव मोदी याने २६ फेब्रुवारी रोजी पीएनबीला एक ई-मेल पाठवून तडजोडीचा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावात २ हजार कोटींचे दागिने, चालू खात्यातील २०० कोटी आणि ५० कोटींची स्थावर मालमत्ता एवढा ऐवज घेऊन आपला हिशेब पूर्ण करून टाका, असे मोदीने म्हटले होते. पीएनबीचे सरव्यवस्थापक अश्विनी वत्स यांनी या पत्राला लिहिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, घोटाळ्यातील रकमेची तुम्हाला जाणीव आहे. तरीही तुम्ही किरकोळ रक्कम देऊन तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तुमचा हा प्रस्ताव मोघम आणि वेळकाढूपणाची युक्ती आहे. तुमच्या प्रस्तावात प्रामाणिकपणा, सत्यता आणि विश्वासार्हता यांचाच अभाव आहे.
>कर्मचाºयांची जबाबदारी तुमचीच
आपल्या कंपनीच्या कर्मचाºयांची देणी देण्यासाठी बँकेनेच कंपनीच्या व्यवस्थापनाचा ताबा घ्यावा, असा प्रस्तावही मोदीने दिला होता.
तो फेटाळताना बँकेने म्हटले की, कर्मचाºयांची वैधानिक देणी व वेतन देण्याची जबाबदारी तुमचीच आहे. बँकेचा त्याच्याशी संबंध नाही.

Web Title: PNB rejects Neerav Modi's proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.