Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पीएफवरील व्याजदरात मोठी कपात

नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पीएफवरील व्याजदरात मोठी कपात

नोकरदार वर्गासाठी महत्वाच्या असलेल्या कर्मचारी भविष्य निधी (पीएफ)वरील व्याजदरात कपात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 07:33 AM2018-02-22T07:33:07+5:302018-02-22T08:56:25+5:30

नोकरदार वर्गासाठी महत्वाच्या असलेल्या कर्मचारी भविष्य निधी (पीएफ)वरील व्याजदरात कपात केली आहे.

PF interest rate lowered yet again, this time to 8.55% | नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पीएफवरील व्याजदरात मोठी कपात

नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पीएफवरील व्याजदरात मोठी कपात

नवी दिल्ली - नोकरदार वर्गासाठी महत्वाच्या असलेल्या कर्मचारी भविष्य निधी (पीएफ)वरील व्याजदरात कपात केली आहे. व्याजदर कपात कऱण्याची शिफारस कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) केली होती. सध्या 8.65 टक्के असलेला व्याजदार 2017-18 वर्षासाठी 8.55 टक्के होऊ शकतो. ईपीएफओच्या या निर्णयाचा पाच कोटी कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्याता आहे.  हा नोकरदारवर्गासाठी एक धक्का आहे. गेल्या पाच वर्षातील हा सर्वात कमी व्याजदर आहे. 

गेल्या तीन वर्षामध्ये पीएफवरील व्याजदात सतत कपात केली जात आहे.  ईपीएफओने 2016-17 मध्ये 8.65 टक्के व्याजदराची घोषणा केली होती. त्यापूर्वी 2015-16मध्ये पीएफवरील व्याजदर 8.80 टक्के होता. 

ईपीएफओ ऑगस्ट 2015 पासून ईटीएफ ( Exchange-traded funds)मध्ये गुंतवणूक करत आहे.  ईपीएफओने आतापर्यंत ईटीएफमध्ये 44,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत याचा कोणताही फायदा झालेला नाही. चालू आर्थिक वर्षांमधील स्थिती पाहता ईटीएफबाबात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यासाठी ईपीएफमार्फत एक प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.   

8.65 वर व्यजदर स्थिर रहावा म्हणून सरकर 2015 मधील ईपीएफओचे काही शेअर्स विकण्याची तयारी करण्यात आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, पीएफचा व्यजदर 8.65 टक्के स्थिर रहावा म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.  

Web Title: PF interest rate lowered yet again, this time to 8.55%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.