lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकांच्या संपामुळे अडकणार पेन्शन

बँकांच्या संपामुळे अडकणार पेन्शन

देशभरातील सर्व सरकारी बँक कर्मचारी व अधिकारी बुधवारपासून दोन दिवस संपावर जात आहेत. यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्याच दिवशी बँकांमध्ये गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:20 AM2018-05-29T02:20:30+5:302018-05-29T02:20:30+5:30

देशभरातील सर्व सरकारी बँक कर्मचारी व अधिकारी बुधवारपासून दोन दिवस संपावर जात आहेत. यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्याच दिवशी बँकांमध्ये गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

Pensions stuck due to bank collapse | बँकांच्या संपामुळे अडकणार पेन्शन

बँकांच्या संपामुळे अडकणार पेन्शन

मुंबई : देशभरातील सर्व सरकारी बँक कर्मचारी व अधिकारी बुधवारपासून दोन दिवस संपावर जात आहेत. यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्याच दिवशी बँकांमध्ये गर्दी उसळण्याची शक्यता आहे. महिन्याच्या अखेरच्या दिवशी पेन्शन काढण्यासाठी बँकेत जाणाऱ्यांनी या संपाची नोंद घेणे आवश्यक आहे.
सरकारी बँकांचे व्यवस्थापन करणाºया इंडियन बँक्स असोसिएशनसह (आयबीए) पगारवाढीसंदर्भातील कर्मचारी युनियनची चर्चा निष्फळ ठरली आहे. आयबीएकडून माफक २ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तो मान्य नसल्याने देशभरातील सरकारी बँक कर्मचारी व अधिकाºयांचे १६ मेपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत ते ३० व ३१ मे रोजी सलग दोन दिवस संप पुकारणार आहेत.
महाराष्टÑात सरकारी बँकांच्या जवळपास ५५०० हजार शाखा आहेत. त्यामधील ३२ हजारहून अधिक कर्मचारी व ८,००० अधिकाºयांचा या संपात सहभागी असेल. नऊ प्रमुख युनियनच्या युनायटेड फोरम आॅफ बँक्स युनियनने (यूएफबीयू) या संपाची हाक
दिली आहे.
याबाबत आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे महाराष्टÑ सरचिटणीस देविदास तुळजापूरकर म्हणाले की, या आधीही वेतनश्रेणी निश्चित करताना कर्मचाºयांवर अन्याय झाला होता. आता यंदा महागाई ५ टक्क्यांनी वाढत असताना, व्यवस्थापन मात्र फक्त २ टक्के वाढ देत आहे. या विरोधात हे आंदोलन आहे. याखेरीज सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सक्षम असलेल्या सरकारी बँका तोट्यात जात आहेत. बँकिंग क्षेत्राला वाचविण्याची मागणीही या आंदोलनाद्वारे केली जात आहे.

३१ तारखेला मासिक वेतन व पेन्शन जमा होणार नाही
संपानंतर १ व २ जूनला बँकांमध्ये गर्दीची शक्यता
पेन्शनर्सने ४ जूनलाच बँकेत जाण्याचे आवाहन
महिनाअखेरीस एटीएमवर अवलंबून न राहता दोन दिवस आधीच पैसे काढून ठेवावे
महिनाअखेरीस मंजूर होणारे कर्ज अडकणार
मासिक पेमेंटचे धनादेश पुढील महिन्यातच वटणार

Web Title: Pensions stuck due to bank collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.