lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एक कोटी ग्राहक नाकारतील सबसिडी

एक कोटी ग्राहक नाकारतील सबसिडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक परिस्थिती चांगली असलेले जवळपास एक कोटी ग्राहक एलपीजी सबसिडी नाकारतील, अशी आशा सरकार बाळगून आहे.

By admin | Published: March 29, 2015 11:29 PM2015-03-29T23:29:04+5:302015-03-29T23:29:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक परिस्थिती चांगली असलेले जवळपास एक कोटी ग्राहक एलपीजी सबसिडी नाकारतील, अशी आशा सरकार बाळगून आहे.

One crore subscribers reject subsidy | एक कोटी ग्राहक नाकारतील सबसिडी

एक कोटी ग्राहक नाकारतील सबसिडी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक परिस्थिती चांगली असलेले जवळपास एक कोटी ग्राहक एलपीजी सबसिडी नाकारतील, अशी आशा सरकार बाळगून आहे.
बाजारभावाने एलपीजी सिलिंडर खरेदी करण्याची कुवत असलेल्यांंनी सबसिडी घेऊ नये, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एक कोटींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. बघू या किती लोक एलपीजी सबसिडी नाकारतात? देशभरात १५.३ कोटी एलपीजी ग्राहक आहेत.
मागच्या आठवड्यात एका अधिवेशनात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, आजवर २.८ लाख लोकांनी एलपीजी सबसिडी सोडून दिली आहे. त्यामुळे १०० कोटी रुपयांची बचत झाली आहे. २ लाख ८० हजार लोकांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. या शंभर कोटींचा उपयोग गरिबांच्या कल्याणासाठी करता येईल. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना सुरू केल्याने अनेकांनी सबसिडी नाकारण्याचे ठरविले आहे. अशी माहिती देण्यात आली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: One crore subscribers reject subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.