lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दुबईतून सोन्याच्या तस्करीची नवी मोडस आॅपरेंडी आली उजेडात

दुबईतून सोन्याच्या तस्करीची नवी मोडस आॅपरेंडी आली उजेडात

संयुक्त अरब अमिरातीतून सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवी पद्धत व्यापारी मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे उघड झाल्यानंतर सक्त वसुली संचालनालयाने त्यांना अटकाव करण्यासाठी तुकड्यांची स्थापना केली आहे.

By admin | Published: March 20, 2015 11:37 PM2015-03-20T23:37:50+5:302015-03-20T23:37:50+5:30

संयुक्त अरब अमिरातीतून सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवी पद्धत व्यापारी मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे उघड झाल्यानंतर सक्त वसुली संचालनालयाने त्यांना अटकाव करण्यासाठी तुकड्यांची स्थापना केली आहे.

New mode of smuggling of gold from Dubai comes to light | दुबईतून सोन्याच्या तस्करीची नवी मोडस आॅपरेंडी आली उजेडात

दुबईतून सोन्याच्या तस्करीची नवी मोडस आॅपरेंडी आली उजेडात

डिप्पी वांकानी - मुंबई
संयुक्त अरब अमिरातीतून सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवी पद्धत व्यापारी मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे उघड झाल्यानंतर सक्त वसुली संचालनालयाने त्यांना अटकाव करण्यासाठी तुकड्यांची स्थापना केली आहे. सक्त वसुली संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार बनावट कंपन्या ‘चेक डिस्काऊंटर्स’ म्हणून काम करताना सोन्याचा पुरवठा करणाऱ्यांचे पैसे देण्यासाठी अधिकृत बँकांमार्फत डॉलर्स पाठवीत आहेत.
काही नामंकित दागदागिने बनविणाऱ्या कंपन्या आता सक्त वसुली संचालनालयाच्या रडारवर आल्या आहेत. दुबईच्या तुलनेत भारतात सोन्याच्या किमती वाढत असल्यामुळे व्यापारी काळ्या बाजारातून सोने घेऊन त्यात १५ टक्के नफा मिळवीत आहेत व त्यामुळे सोन्याची तस्करी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत नामवंत विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसह अनेक लोक सोन्याची तस्करी करताना कस्टम्सच्या हवाई गुप्तचर शाखेने पकडले होते.
नेहमीच्या व्यवहारानुसार स्थानिक व्यापारी तस्करीच्या माध्यमातून सोने प्राप्त करतो. या सोन्याची किंमत तो स्थानिक पातळीवरील कोणाला तरी देतो. ती व्यक्ती पैसे दुबईतील त्याच्या पुरवठादाराला देते. अशा प्रकारे हवाला व्यवहार पूर्ण होतो, असे या अधिकाऱ्याने सांगितले. या अधिकाऱ्यानुसार ही व्यवहाराची पद्धत (मोडस आॅपरेंडी) हळूहळू कमी होत गेली आणि ‘चेक डिस्काऊंटर्स’ म्हणून काम करणाऱ्या कंपन्या व व्यक्ती सोन्याचे पैसे अदा करण्यासाठी (तेही डॉलरच्या रूपात) अधिकृत बँकांचे माध्यम वापरत आहेत. एकदा सोने प्राप्त झाले की स्थानिक व्यापारी ‘चेक डिस्काऊंटर्स’ला भेटतो व त्याला रोख रक्कम देतो. या चेकसोबत तो डॉलरचा पुरवठा करणाऱ्याला चेक देण्यासाठी कमिशनपोटी थोडी रक्कमही देतो. दुबईतील व्यापाऱ्याला अशा व्यवहारामुळे रोखीची देवघेव करावी लागत नाही, शिवाय व्यवहार चेकने होत असल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाला टाळता येते. स्थानिक कंपन्या आयातीसाठी अ‍ॅडव्हान्सेस दाखवतात व बंदरात बनावट पावत्या तयार करून संपूर्ण व्यवहार कायदेशीर दाखवितात.

Web Title: New mode of smuggling of gold from Dubai comes to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.