lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नऊ सरकारी बँकांवर नवे कार्यकारी संचालक, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे आदेश

नऊ सरकारी बँकांवर नवे कार्यकारी संचालक, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे आदेश

सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँकांवर सरकारने कार्यकारी संचालकांच्या (ईडी) नेमणुका केल्या आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:26 AM2017-10-11T00:26:07+5:302017-10-11T00:26:12+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँकांवर सरकारने कार्यकारी संचालकांच्या (ईडी) नेमणुका केल्या आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

 New Executive Director, Department of Personnel and Training, on nine government banks | नऊ सरकारी बँकांवर नवे कार्यकारी संचालक, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे आदेश

नऊ सरकारी बँकांवर नवे कार्यकारी संचालक, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे आदेश

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँकांवर सरकारने कार्यकारी संचालकांच्या (ईडी) नेमणुका केल्या आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार बजरंग सिंग शेखावत यांची सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. ते याच बँकेत महाव्यवस्थापक होते. विजया बँकेचे महाव्यवस्थापक असलेले गोविंद एन. डोंगरे यांची पंजाब अँड सिंध बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नेमणूक झाली आहे.
अजयकुमार श्रीवास्तव आणि मतम वेंकट राव हे अनुक्रमे इंडियन ओव्हरसीज बँक आणि कॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक बनले आहेत. दोघेही सध्या अलाहाबाद बँकेत महाव्यवस्थापक होते. बँक आॅफ इंडियात महाव्यवस्थापक असलेले कुलभूषण जैन आंध्र बँकेचे कार्यकारी संचालक झाले आहेत. राजेश कुमार यदुवंशी आणि चैतन्य गायत्री चिंतापल्ली अनुक्रमे देना बँक आणि बँक आॅफ इंडियाचे कार्यकारी संचालक झाले आहेत.
कृष्णन एस. यांना सिंडिकेट बँकेचे कार्यकारी संचालक करण्यात आले आहे. ते इंडियन बँकेत महाव्यवस्थापक होते. अलाहाबाद बँकेत महाव्यवस्थापक असलेले लिंगम वेंकट प्रभाकर यांची पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title:  New Executive Director, Department of Personnel and Training, on nine government banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक