lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महावितरणला दिलासा; वीज चोरीचे प्रमाण घटले

महावितरणला दिलासा; वीज चोरीचे प्रमाण घटले

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (महावितरण) कंपनीकडून राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनामुळे महावितरणच्या वीज चोरीचे प्रमाण घटले आहे. मा

By admin | Published: June 1, 2015 11:49 PM2015-06-01T23:49:16+5:302015-06-01T23:49:16+5:30

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (महावितरण) कंपनीकडून राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनामुळे महावितरणच्या वीज चोरीचे प्रमाण घटले आहे. मा

MahaVitra gets relief; Electricity stolen decreased | महावितरणला दिलासा; वीज चोरीचे प्रमाण घटले

महावितरणला दिलासा; वीज चोरीचे प्रमाण घटले

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (महावितरण) कंपनीकडून राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनामुळे महावितरणच्या वीज चोरीचे प्रमाण घटले आहे. मागील दहा वर्षातील महावितरण प्रशासनाने विविध उपाययोजना केल्यामुळे २००५ साली ३१़७२ टक्केच्या आसपास असलेली वीजचोरी आज १३़९५ टक्केपर्यंत खाली आणण्यात महावितरणला यश आले आहे.
दरम्यान, राज्यात सर्वांना वीज मिळावी यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यामातून प्रत्येकाला कमी पैशात, कमी कालावधीत वीजजोडणी देण्याचा प्रयत्न केला़ त्यानुसार या योजनेला मोठया प्रमाणात प्रतिसादही मिळाला़ मात्र महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षपणामुळे राज्यात वीज चोरीचे प्रमाण वाढले होते. राज्यात आकडे टाकून, एकाच कनेक्शनवर दोनठिकाणी विजेचा वापर, मीटर रिडिंगमध्ये फेरफर करणे आदी विज चोरीच्या शक्कल वीज ग्राहकांनी लढविल्या होत्या.
१२० पथके, पोलिस ठाणे कार्यरत
वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण प्रशासनाने राज्यात १२० पथके तयार केली आहेत़ शिवाय वीज चोरांवर त्वरीत गुन्हा दाखल करण्यासाठी पुणे, नाशिक, नागपूर, जालना, लातूर, कल्याण अशा सहा ठिकाणी पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे़ शिवाय वीजचोरीचा खटला त्वरीत निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयाचीही निर्मिती केली आहे़

Web Title: MahaVitra gets relief; Electricity stolen decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.