Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात

खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच मोदी सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 09:05 AM2019-02-01T09:05:15+5:302019-02-01T09:05:24+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच मोदी सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे.

LPG Cylinders Price: New Rate Of LPG Cylinder For subsidy And Non subsidy cylinder After Budget | खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात

खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच मोदी सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे. मोदी सरकारनं घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 1.46 रुपयांची कपात केली आहे. तर विनाअनुदानित सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त केला आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरसाठी राजधानीत 493.53 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईसह देशातील अन्य शहरांमध्येही ही दरकपात लागू केली जाईल. 

तत्पूर्वी नव्या वर्षात केंद्र सरकारनं एलपीजी धारकांना मोठं गिफ्ट दिलं होतं. विनाअनुदानित गॅस सिलिंडर 120.50 रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता, तर अनुदानित सिलिंडरच्या किमतीत 5 रुपयांची घट केली, अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिली होती. दर कमी केल्याने 14.2 किलोचा अनुदानित सिलिंडर 500.90 रुपयांऐवजी आता 494.99 रुपयांना मिळत होता. तर विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 120.50 रुपयांची कपात केल्यानं आता 809.50 रुपयांचा विनाअनुदानित सिलिंडर 689 रुपयांना मिळत होता. भारतातील सर्वात मोठी तेल पुरवठादार कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं ही माहिती दिली आहे.

Budget 2019 Latest News & Live Updates

एलपीजी सिलिंडरचे या महिन्यात दुसऱ्यांदा दर कमी करण्यात आले आहेत. 1 डिसेंबर रोजी अनुदानित सिलिंडरचे दर 6.50 रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे उद्यापासून नव्या दरानुसार ग्राहकांना सिलिंडर मिळणार आहे. वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. 

Web Title: LPG Cylinders Price: New Rate Of LPG Cylinder For subsidy And Non subsidy cylinder After Budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.