lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्जे महागणार! पतधोरणावर इंधन दरवाढीचे ‘सावट’

कर्जे महागणार! पतधोरणावर इंधन दरवाढीचे ‘सावट’

बँकांची कर्जे महागण्याची शक्यता आहे. भडकलेल्या इंधन दरांमुळे निर्माण झालेली महागाई नियंत्रणात आणण्यास रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. यासंबंधी द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक सोमवारपासून सुरू होत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:39 AM2018-06-04T00:39:38+5:302018-06-04T00:39:38+5:30

बँकांची कर्जे महागण्याची शक्यता आहे. भडकलेल्या इंधन दरांमुळे निर्माण झालेली महागाई नियंत्रणात आणण्यास रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. यासंबंधी द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक सोमवारपासून सुरू होत आहे.

 Loans will be expensive! Fuel price hike on 'soft' | कर्जे महागणार! पतधोरणावर इंधन दरवाढीचे ‘सावट’

कर्जे महागणार! पतधोरणावर इंधन दरवाढीचे ‘सावट’

मुंबई : बँकांची कर्जे महागण्याची शक्यता आहे. भडकलेल्या इंधन दरांमुळे निर्माण झालेली महागाई नियंत्रणात आणण्यास रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. यासंबंधी द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक सोमवारपासून सुरू होत आहे.
रिझर्व्ह बँक दर दोन महिन्यांनी बाजारातील स्थितीचा आढावा घेऊन पतधोरण जाहीर करते. महागाई नियंत्रणात आणण्यासह देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना त्यामध्ये केल्या जातात. प्रामुख्याने रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजादर (रेपो रेट) कमी-अधिक केले जातात.
रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट सध्या ६ टक्के आहे. बँकेने आॅक्टोबर २०१७ पासून हा दर कायम ठेवला आहे. बाजारात खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी कर्जे स्वस्त व्हावी व त्यासाठी रेपो रेट कमी करण्याचा आग्रह वित्त मंत्रालयासह उद्योग जगतातून होत आहे. पण महागाई दरात वाढ होत असल्याने रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय बँकेने घेतला. आता तर इंधनामुळे महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळेच रेपो रेट कमी होण्याऐवजी त्यात वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवारपासून सुरू होणारी ही बैठक ६ जूनला संपेल. रिझर्व्ह बँके बुधवारी दुपारी जपतधोरण जाहिर करणार आहे.

असे आहे महागाईचे गणित
इंधनदरांचा महागाईवर थेट परिणाम होतो. आंतरराष्टÑीय बाजारात खनिज तेल १० डॉलर प्रति बॅरलने वाढल्यास महागाई १.७ टक्के वाढते. रिझर्व्ह बँकेने याआधी ६ एप्रिलला पतधोरण जाहिर केले होते. त्यावेळी खनिज तेलाचा दर ६७ ते ६९ डॉलर प्रति बॅरलदरम्यान होते. आता तो दर ७५ ते ७७ डॉलर झाल्याने पेट्रोल-डिझेल लिटरमागे सरासरी ४ ते ६ रुपयांनी महागले आहे. मे महिन्यातील महागाई ५ टक्क्यांच्यावर राहण्याची श्क्यता आहे. ते पाहता रिझर्व्ह बँक रेपो रेट वाढवेलच, असे आर्थिक क्षेत्राचे मत आहे.

Web Title:  Loans will be expensive! Fuel price hike on 'soft'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.