lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेबीची आज महत्त्वपूर्ण बैठक

सेबीची आज महत्त्वपूर्ण बैठक

त्यासाठी अशा कर्जदारांबाबत असलेल्या निर्बंधांच्या नियमावलीत बदल करण्यात येणार आहेत.

By admin | Published: November 19, 2014 01:17 AM2014-11-19T01:17:04+5:302014-11-19T01:17:04+5:30

त्यासाठी अशा कर्जदारांबाबत असलेल्या निर्बंधांच्या नियमावलीत बदल करण्यात येणार आहेत.

Important meeting of SEBI today | सेबीची आज महत्त्वपूर्ण बैठक

सेबीची आज महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : सेबीच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी होत आहे. हेतूत: थकबाकीदार (विलफुल डिफॉल्टर) झालेल्या कर्जदारांना भांडवली बाजारात भांडवल उभारण्यावर तीन वर्षांची बंदी घालण्याबाबत सेबी विचार करीत आहे. या प्रस्तावावर उद्याच्या बैठकीत विचार होऊ शकतो. त्यासाठी अशा कर्जदारांबाबत असलेल्या निर्बंधांच्या नियमावलीत बदल करण्यात येणार आहेत.
१९९२ च्या सेबी कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा कर्जदारांना भांडवली बाजारात व्यवहार करू देणे चुकीचे ठरणार असून, त्यांच्यावर तीन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

Web Title: Important meeting of SEBI today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.