lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयडीबीआयच्या कर्मचा-यांचा संप टळला, पगारवाढ करण्यासाठी व्यवस्थापन तयार

आयडीबीआयच्या कर्मचा-यांचा संप टळला, पगारवाढ करण्यासाठी व्यवस्थापन तयार

आयडीबीआय बँकेचे २०१२ पासून थांबलेले वेतन पुनर्निधारण (पगारवाढ) करण्याची व्यवस्थापनाने तयारी दर्शवली आहे. यामुळे २० हजार कर्मचा-यांना दिलासा मिळाला असून, त्यांनी २७ डिसेंबरचा संपही तूर्त रद्द केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:10 AM2017-12-21T00:10:24+5:302017-12-21T00:17:37+5:30

आयडीबीआय बँकेचे २०१२ पासून थांबलेले वेतन पुनर्निधारण (पगारवाढ) करण्याची व्यवस्थापनाने तयारी दर्शवली आहे. यामुळे २० हजार कर्मचा-यांना दिलासा मिळाला असून, त्यांनी २७ डिसेंबरचा संपही तूर्त रद्द केला आहे.

 IDBI staffed employees, created management to pay salaries | आयडीबीआयच्या कर्मचा-यांचा संप टळला, पगारवाढ करण्यासाठी व्यवस्थापन तयार

आयडीबीआयच्या कर्मचा-यांचा संप टळला, पगारवाढ करण्यासाठी व्यवस्थापन तयार

मुंबई : आयडीबीआय बँकेचे २०१२ पासून थांबलेले वेतन पुनर्निधारण (पगारवाढ) करण्याची व्यवस्थापनाने तयारी दर्शवली आहे. यामुळे २० हजार कर्मचा-यांना दिलासा मिळाला असून, त्यांनी २७ डिसेंबरचा संपही तूर्त रद्द केला आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारितील आयडीबीआय बँकेतील कर्मचाºयांच्या वेतन पुनर्निधारणाचा विषय आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) उचलला होता. ही बँक थेट केंद्रीय बँकिंग प्रणाली अंतर्गत येत नसली तरी कर्मचाºयांच्या मागण्यांचा विचार करून, एआयबीईएने २७ डिसेंबरला संपाची हाक दिली होती.
एआयबीईए ही बँक कर्मचाºयांची सर्वात मोठी कर्मचारी संघटना असून, या संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता होती. मात्र हा संप टळला आहे.
महिनाभरात निर्णय-
आयडीबीआय बँक व्यवस्थापन व कर्मचारी यांची बुधवारी कामगार आयुक्तालयात सुनावणी झाली.
त्यामध्ये बँक व्यवस्थापनाने पगारवाढीबाबत महिनाभरात विचार व निर्णय करण्याचे आश्वासन दिले.
आयडीबीआय बँक सध्या तोट्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांखाली आहे, हे विशेष.

Web Title:  IDBI staffed employees, created management to pay salaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक