lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोचर यांच्या दिरावरही आयसीआयसीआय बँकेचा वरदहस्त, कर्जांची फेररचना संशयाच्या भोवऱ्यात

कोचर यांच्या दिरावरही आयसीआयसीआय बँकेचा वरदहस्त, कर्जांची फेररचना संशयाच्या भोवऱ्यात

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ तथा एम. डी. चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर यांच्या एका कंपनीवरही आयसीआयसीआय बँकेचा वरदहस्त असल्याचे समोर आले असून, आयसीआयसीआय बँकेच्या कर्जदार असलेल्या सात कंपन्यांच्या १.७ अब्ज डॉलरच्या कर्जाची फेररचना राजीव कोचर यांच्या कंपनीने करून दिल्याचे आढळून आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:15 AM2018-04-04T01:15:41+5:302018-04-04T01:15:41+5:30

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ तथा एम. डी. चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर यांच्या एका कंपनीवरही आयसीआयसीआय बँकेचा वरदहस्त असल्याचे समोर आले असून, आयसीआयसीआय बँकेच्या कर्जदार असलेल्या सात कंपन्यांच्या १.७ अब्ज डॉलरच्या कर्जाची फेररचना राजीव कोचर यांच्या कंपनीने करून दिल्याचे आढळून आले आहे.

ICICI Bank's reorganization of the debt is in doubt | कोचर यांच्या दिरावरही आयसीआयसीआय बँकेचा वरदहस्त, कर्जांची फेररचना संशयाच्या भोवऱ्यात

कोचर यांच्या दिरावरही आयसीआयसीआय बँकेचा वरदहस्त, कर्जांची फेररचना संशयाच्या भोवऱ्यात

 नवी दिल्ली -  आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ तथा एम. डी. चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर यांच्या एका कंपनीवरही आयसीआयसीआय बँकेचा वरदहस्त असल्याचे समोर आले असून, आयसीआयसीआय बँकेच्या कर्जदार असलेल्या सात कंपन्यांच्या १.७ अब्ज डॉलरच्या कर्जाची फेररचना राजीव कोचर यांच्या कंपनीने करून दिल्याचे आढळून आले आहे.
चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या एका कंपनीला व्हिडीओकॉन उद्योग समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांनी मोठी रक्कम दिल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. त्या बदल्यात आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समूहाला ३,२५0 कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप आहे. त्यापाठोपाठ आता राजीव कोचर यांचे नवे प्रकरण समोर आले आहे.
राजीव कोचर हे दीपक कोचर यांचे भाऊ आहेत. राजीव कोचर यांच्या अविस्ता अ‍ॅडव्हायजरी या कंपनीने मागील सहा वर्षांत सात कंपन्यांच्या १.७ अब्ज डॉलरच्या कर्जाची फेररचना करून दिली. या सर्व कंपन्यांनी आयसीआयसीआय बँकेची कर्जे घेतली आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या कर्जाच्या बदल्यात, या कंपन्यांनी राजीव कोचर यांच्या कंपनीला कर्ज फेररचनेसाठी सल्लागार म्हणून नेमल्याचा आरोप आहे. फेररचना झालेली ही बहुतांश कर्जे विदेशी चलनाशी संबंधित आहेत. राजन कोचर यांच्या अविस्ताने २0१७ मध्ये जयप्रकाश असोसिएट्सच्या ११0 दशलक्ष डॉलरच्या विदेशी चलन परिवर्तनीय रोख्यांची फेररचना करून दिली. जयप्रकाश असोसिएट्सला कर्ज देणाºया बँक समूहाचे नेतृत्व आयसीआयसीआय बँकेकडे होते. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्सच्या २00 दशलक्ष डॉलरच्या अशाच रोख्यांची फेररचनाही अविस्ताने करून दिली. यातही आयसीआयसीआय बँकच नेतृत्वस्थानी होती.'

या आहेत त्यांच्या कंपन्या

अविस्ता अ‍ॅडव्हायजरीने पुनर्रचना केलेल्या काही प्रकरणात स्वत: आयसीआयसीआय बँकच कर्जदात्या बँक समूहाचे नेतृत्व करीत होती.
अविस्ताने ज्या कंपन्यांच्या कर्जांची पुनर्रचना केली, त्यात जयप्रकाश असोसिएट्स जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर, सुझलॉन, जेएसएल आणि व्हिडीओकॉन समूह यांचा समावेश आहे.

Web Title: ICICI Bank's reorganization of the debt is in doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.