lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गृहकर्ज स्वस्त होणार, कर्जाचा हप्ता कमी होणार

गृहकर्ज स्वस्त होणार, कर्जाचा हप्ता कमी होणार

रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात केलेल्या कपातीचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्वागत करून यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळण्याची आशा व्यक्त केली.

By admin | Published: March 5, 2015 12:08 AM2015-03-05T00:08:30+5:302015-03-05T00:08:30+5:30

रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात केलेल्या कपातीचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्वागत करून यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळण्याची आशा व्यक्त केली.

Housing loan will be cheaper, loan default will be reduced | गृहकर्ज स्वस्त होणार, कर्जाचा हप्ता कमी होणार

गृहकर्ज स्वस्त होणार, कर्जाचा हप्ता कमी होणार

उद्योग जगतातून स्वागत : रिझर्व्ह बँकेच्या दरकपातीचा मोठा लाभ अपेक्षित; जागतिक पातळीवरही घटत्या महागाईचे संकेत
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात केलेल्या कपातीचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्वागत करून यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळण्याची आशा व्यक्त केली. व्याजदर कमी झाल्यामुळे कर्जफेडीचा हप्ता बराच कमी होईल. मुख्य व्याजदरात आणखी कपातीला संधी आहे, असेही सिन्हा म्हणाले. दरम्यान, बँकांनी व्याजदर कपातीचे संकेत दिले असून, उद्योग जगातून या कपातीचे स्वागत करण्यात आले आहे.
व्याजदरात कपात झाल्यामुळे गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावर जणू विश्वासच व्यक्त झाल्याचे जयंत सिन्हा यांनी म्हटले. कपात झालेल्या व्याजदरामुळे अर्थव्यवस्थेला लवकरच प्रोत्साहन मिळेल आणि कर्जफेडीचा हप्ताही कमी होईल. चलनवाढीचा अंदाज कमी झाला असून, जागतिक पातळीवर घटत्या चलनवाढीचे संकेत आहेत, असे ते म्हणाले.
सिन्हा म्हणाले की, ‘आम्ही संसदेत सांगितले होते की, आम्ही खूप तर्कसंगतरीत्या राजकोषाचे पुनर्गठन करीत आहोत. आमचे लक्ष्य वृद्धीला सतत चलनवाढीशिवायच्या रस्त्यावर ठेवण्याचे आहे. कर्जफेडीचा मासिक हप्ता कमी होईल अशा अवस्थेला आम्ही आहोत.’ रिझर्व्ह बँकेने अर्थसंकल्पीय समतोलाचे कौतुक केले असून, देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी हे पाऊल स्वागतार्ह आहे. कारण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळण्याची प्रत्येकाला आशा आहे, असे ते
म्हणाले. मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांनीही व्याजदर कपातीचे स्वागत करताना यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळेल, असे म्हटले.

४रिझर्व्ह बँकेच्या दर कपातीमुळे गृहकर्जे तेच ग्राहक कर्जांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास केंद्रीय महसूल सचिव शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. ज्यांना बँकाकंडून घरांसाठी कर्ज घ्यायचे आहे, अशा व्यावसायिक, उद्योजक आणि सामान्य नागरिकांसाठी ही कपात चांगली आहे.

सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी सांगितले की, व्याजदरात कपात करून रिझर्व्ह बँकेने अत्यंत सकारात्म धोरणाचे संकेत दिले आहेत. याचा लाभ अर्थव्यवस्थेला होईल. असोचेमचे अध्यक्ष राणा कपूर यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेची दरकपात अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अत्यंत प्रोत्साहक आहे. केंद्रीय बँकेचे फोकस क्षेत्र त्यातून स्पष्ट होते.

 

Web Title: Housing loan will be cheaper, loan default will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.