lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आॅक्टोबर-डिसेंबरमध्ये घरांच्या किमती वाढल्या

आॅक्टोबर-डिसेंबरमध्ये घरांच्या किमती वाढल्या

२0१५-१६ या वित्तीय वर्षातील आॅक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत देशात घरांच्या किमती वाढल्याचे रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालात म्हटले आहे.

By admin | Published: April 30, 2016 05:15 AM2016-04-30T05:15:34+5:302016-04-30T05:15:34+5:30

२0१५-१६ या वित्तीय वर्षातील आॅक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत देशात घरांच्या किमती वाढल्याचे रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालात म्हटले आहे.

Home prices increased in October-December | आॅक्टोबर-डिसेंबरमध्ये घरांच्या किमती वाढल्या

आॅक्टोबर-डिसेंबरमध्ये घरांच्या किमती वाढल्या

मुंबई : २0१५-१६ या वित्तीय वर्षातील आॅक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत देशात घरांच्या किमती वाढल्याचे रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालात म्हटले आहे. हा अहवाल गुरुवारी जारी केला गेला.
या अहवालानुसार, २0१५-१६च्या आॅक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत वार्षिक स्तरावर सर्वाधिक किमती लखनौमध्ये वाढल्या, तर जयपूरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. गेल्या वित्तीय वर्षातील तिसऱ्या तिमाहीत गृहमूल्य सूचकांक वाढून २२१.७ वर गेला. यापूर्वीच्या तिमाहीत तो २१८.२ होता. रिझर्व्ह बँकेच्या तिमाहीत सूचकांकसंबंधी अहवालात म्हटले आहे की, वार्षिक स्तरावर २0१५-१६च्या तिसऱ्या तिमाहीत लखनौमध्ये घरांच्या किमती सर्वाधिक १६.१ टक्क्यांनी वाढल्या.
रिझर्व्ह बँकेने संपूर्ण भारतात आणि मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, लखनौ, अहमदाबाद, जयपूर, कानपूर आणि कोची या १0 प्रमुख शहरांबाबत २0१५-१६च्या तिसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत.
>जागतिक गृहबाजारात घट
भारतात वर्षभरात घराच्या किमती ८.६ टक्क्यांनी वाढल्या, तर जागतिक स्तरावर चार वर्षांनंतर गेल्या तिमाहीत किमतीत घसरण नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. ‘ग्लोबल हाउसिंग वॉच’ नावाच्या या अहवालानुसार, जगभरात घरांच्या किमती घसरत असताना भारतात मात्र त्या वाढल्या. अर्थात, या अहवालात भारताची ही आकडेवारी २0१५च्या सप्टेंबरमध्ये समाप्त झालेल्या तिमाहीतील आहे.

Web Title: Home prices increased in October-December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.