lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीची पतंगबाजी; कायदा न पाळल्यास ‘हाताला जखम’!

जीएसटीची पतंगबाजी; कायदा न पाळल्यास ‘हाताला जखम’!

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, मकर संक्रांतीचा सण ८ दिवसांवर आला आहे. लहान मुलांनी पतंग उडविण्यास सुरुवातदेखील केलेली आहे. ६ महिन्यांपासून सरकारही जीएसटीचा पतंग उडविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर तू याबद्दल काय सांगशील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:46 AM2018-01-08T00:46:30+5:302018-01-08T00:46:41+5:30

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, मकर संक्रांतीचा सण ८ दिवसांवर आला आहे. लहान मुलांनी पतंग उडविण्यास सुरुवातदेखील केलेली आहे. ६ महिन्यांपासून सरकारही जीएसटीचा पतंग उडविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर तू याबद्दल काय सांगशील?

 GST kite flying; 'No injuries' if the law is not followed! | जीएसटीची पतंगबाजी; कायदा न पाळल्यास ‘हाताला जखम’!

जीएसटीची पतंगबाजी; कायदा न पाळल्यास ‘हाताला जखम’!

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, मकर संक्रांतीचा सण ८ दिवसांवर आला आहे. लहान मुलांनी पतंग उडविण्यास सुरुवातदेखील केलेली आहे. ६ महिन्यांपासून सरकारही जीएसटीचा पतंग उडविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर तू याबद्दल काय सांगशील?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, सामान्यपणे संक्रांतीला आपण सगळ्यांना ‘तीळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणतो, परंतु सरकारचे वेगळेच काहीतरी असते. सरकार करदात्यांना म्हणते, ‘तीळ गुळ घ्या, जीएसटीचे नियम पाळा.’ या वर्षी जर जीएसटी आणि पतंगबाजी यांना आपण जोडले, तर पतंग उडवणारा म्हणजे, ‘करदाता’, पतंग म्हणजे ‘जीएसटी’, चक्री म्हणजे ‘करदात्याची लेखापुस्तके’, गुंतागुंती म्हणजे ‘रिटर्न्स’, हवा म्हणजे ‘कर संकलन’, काटाकाटी म्हणजे ‘मॅचिंग मिसमॅचिंग’ आणि मांजा म्हणजे ‘कायदा’, परंतु या वेळी ई-वे बिलचा नवीनच मांजा सरकारच्या बाजारात उपलब्ध आहे. पतंग काटणारा म्हणजे, कर अधिकारी आणि सर्वांत महत्त्वाची ढील देणारा म्हणजे कर सल्लागार. मकर संक्रांतीनंतर थंड वारे कमी होतात आणि उष्णतेचे वारे वाहू लागतात. या वर्षीदेखील असेच झाले. अप्रत्यक्ष करांच्या थंड वाºयांऐवजी आता जीएसटीचे उष्ण वारे वाहू लागले आहेत. सध्या जीएसटीमध्ये खूपच पतंगबाजी सुरू आहे. पतंगबाजीत अनेक पतंग उडवल्यावर जशी मांजामध्ये गुंतागुंत होते, तशी करदात्याची आणि त्याचबरोबर करसल्लागाराची अवस्था झालेली आहे.
अर्जुन : कृष्णा, रिटर्न्सची गुंतागुंत कशामुळे होत आहे?
कृष्ण : अर्जुना, जीएसटी प्रणालीमध्ये खूप बदल होत असल्यामुळे सरकार देय तारखा वाढवून देत आहे. करदात्यांवरही रिटर्न्सचा भडिमार होत आहे. एकानंतर एक रिटर्न त्यांना दाखल करावेच लागत आहेत. आज ३बी, उद्या जीएसटीआर-१ नंतर जीएसटीआर-२, त्यानंतर अंतिम रिटर्न म्हणजेच जीएसटीआर-३ दाखल करावे लागेल. सध्या घाईघाईत रिटर्न दाखल करणे चालू आहे. त्यामुळे देय तारखा आणि घाईमुळे रिटर्न्सची गुंतागुंत होत आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये काटाकाटी कशी होईल ?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीमध्ये पतंगाची काटाकाटी म्हणजे मॅचिंग मिसमॅचिंगची संकल्पना होय. काटाकाटी म्हणजे आपल्या पतंगाने दुसºयाचा पतंग कापणे, त्याचप्रमाणे मॅचिंग मिसमॅचिंग म्हणजे दुसºयाने आपल्या नावाने दाखविलेली विक्रीही आपलीच खरेदी आहे की नाही हे सांगणे होय. मॅचिंग मिसमॅचिंगवरूनच आयटीसी मिळणार आहे, परंतु ही संकल्पनाच आणखीही अंमलात आणण्यात आलेली नाही. जीएसटीच्या नेटवर्कवरही काटाकाटी होईल आणि मॅचिंग मिसमॅचिंगमध्ये ज्याचे जुळेल, त्याचा पतंग टिकेल आणि जुळणी झाली नाही, तर त्याचा पतंग कटेल.
अर्जुन : कृष्णा, सध्या जीएसटीची हवा कशी आहे?
कृष्ण: अर्जुना, जसे पतंगबाजीमध्ये ‘हवा’ असेल, तरच पतंग उडवण्यास मज्जा येते, त्याचप्रमाणे जीएसटीमध्ये कर संकलन होत असेल, तरच सरकार आनंदी होईल. सध्या तरी जीएसटीने अपेक्षेपेक्षा कमी कर संकलित केला आहे. अहवालानुसार सरकारचा जुलै महिन्यात जवळजवळ ९२ हजार कोटी महसूल गोळा झाला. त्याचप्रमाणे, आॅगस्टमध्ये ९० हजार कोटी, सप्टेंबरमध्ये ९२ हजार कोटी, आॅक्टोबरमध्ये ९५ हजार कोटी आणि नोव्हेंबरमध्ये ८३ हजार कोटी महसूल गोळा झाला. म्हणूनच सध्या करसंकलन कमी असल्यामुळे जीएसटीची हवा गेलेली आहे आणि त्यामुळे सरकार हैराण आहे. आता गेलेली हवा फक्त येणाºया बजेटच्याच रूपाने भरता येईल.
अर्जुन : कृष्णा, करसल्लागाराची सध्या काय अवस्था आहे?
कृष्ण: अर्जुना, करसल्लागारामागे व्हॅट रिटर्नची धावपळ चालू आहे. व्हॅट आॅडिटसाठी १५ जानेवारी ही शेवटची तारीख आहे, तर जीएसटीआर-१ साठी १० जानेवारी ही देय तारीख आहे. त्यामुळे करसल्लागार संभ्रमावस्थेत आहे. दोन्ही गोष्टींमुळे तो सध्या हैराण झाला आहे आणि आता कोणता पतंग उडवावा, हेच त्याला कळत नाही.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीच्या पतंगबाजीतून करदात्याने काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, काचेच्या मांज्याने जास्त पतंग उडवल्याने हात कापण्याची भीती असते, तसेच कायदा हातात घेतल्यानेही जखम होऊ शकते. म्हणून कायद्याचे पालन करून व्यापार करावा. कायदा हातात घेऊ नये नाहीतर हात कापला जाईल.
-सी. ए. उमेश शर्मा

Web Title:  GST kite flying; 'No injuries' if the law is not followed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी