lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाहन उत्पादक कंपन्यांना अच्छे दिन

वाहन उत्पादक कंपन्यांना अच्छे दिन

देशातील काही प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी मे महिन्यातील आपल्या कामगिरीची आकडेवारी प्रसिद्ध केली. कार उत्पादक कंपन्यांपैकी मारुती

By admin | Published: June 1, 2015 11:34 PM2015-06-01T23:34:34+5:302015-06-01T23:34:34+5:30

देशातील काही प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी मे महिन्यातील आपल्या कामगिरीची आकडेवारी प्रसिद्ध केली. कार उत्पादक कंपन्यांपैकी मारुती

Good days to automakers | वाहन उत्पादक कंपन्यांना अच्छे दिन

वाहन उत्पादक कंपन्यांना अच्छे दिन

नवी दिल्ली : देशातील काही प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी मे महिन्यातील आपल्या कामगिरीची आकडेवारी प्रसिद्ध केली. कार उत्पादक कंपन्यांपैकी मारुती सुझुकी आणि होंडा यांची विक्री वाढली आहे. अवजड वाहन उत्पादक कंपन्यांपैकी अशोक लेलँडची विक्री वाढली आहे. महिंद्रा अँड महिंद्राची विक्री मात्र घटली आहे.
देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या विक्रीत १३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. १,१४,८२५ गाड्या कंपनीने विकल्या. गेल्या वर्षी १,00,९२५ गाड्या विकल्या गेल्या होत्या. आॅल्टो आणि वॅगन आर या छोट्या गाड्यांच्या विक्रीत २0.६ टक्के वाढ झाली आहे.
कार उत्पादक होंडा कार्स इंडियाची विक्री वाढून १३,४३१ गाड्या झाली. गेल्या वर्षी १३,३६२ गाड्यांची विक्री झाली होती. कार उत्पादक कंपनी ह्युंदाईची विक्री १.५ टक्क्यांनी वाढून ५२,५१५ गाड्यांवर पोहोचली. गेल्या वर्षी कंपनीने ५१,७१८ गाड्या विकल्या होत्या. फॉक्स वॅगनच्या विक्रीत तब्बल ५६.८३ टक्के वाढ झाली आहे. ४,१६७ कारची विक्री कंपनीने केली. गेल्या वर्षी हा आकडा २,६५७ गाड्या इतकाच होता.
हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अशोक लेलँडची ९,२९४ वाहने मे महिन्यात विकली गेली. गेल्या वर्षी ६,६३२ वाहने विकली गेली होती. महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत ३ टक्क्यांची घट झाली आहे. ३६,७0६ वाहने कंपनीने विकली. गेल्या वर्षी कंपनीने ३७,८६९ वाहने विकली होती. कंपनीच्या निर्यातीत मात्र ४0.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. आयशरची विक्री ७.६ टक्क्यांनी वाढून ४,0३५ वाहनांवर गेली. आदल्या वर्षी कंपनीने ३,७५0 वाहनांची विक्री केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Good days to automakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.