lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मागणी किरकोळ राहिल्याने सोने स्थिर, चांदी मजबूत

मागणी किरकोळ राहिल्याने सोने स्थिर, चांदी मजबूत

छोट्या व्यावसायिकांकडून आलेल्या किरकोळ मागणीमुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव

By admin | Published: December 25, 2014 12:23 AM2014-12-25T00:23:36+5:302014-12-25T00:23:36+5:30

छोट्या व्यावसायिकांकडून आलेल्या किरकोळ मागणीमुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव

Gold remains stable due to retail demand, silver remains strong | मागणी किरकोळ राहिल्याने सोने स्थिर, चांदी मजबूत

मागणी किरकोळ राहिल्याने सोने स्थिर, चांदी मजबूत

नवी दिल्ली : छोट्या व्यावसायिकांकडून आलेल्या किरकोळ मागणीमुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर म्हणजेच २७ हजार रुपये तोळा या दरावर कायम राहिला. चांदीच्या भावात १५0 रुपयांची वाढ झाली. त्याबरोबर चांदी ३६,५00 रुपये किलो झाली.
भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतीवर परिणाम करणाऱ्या सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव 0.२५ टक्के तेजीसह ११७९.८0 डॉलर प्रतिऔंस असा झाला. या तेजीचा लाभ दिल्लीतील बाजाराला होऊ शकला नाही.
दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धता आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव अनुक्रमे २७,000 रुपये आणि २६,८00 रुपये प्रति तोळा असा कायम राहिला. सोन्याच्या आठ ग्रँमच्या गिन्नीचा भावही २३,७00 रुपये असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव १५0 रुपयांनी वाढल्यानंतर ३६,५00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १५0 रुपयांनी वाढून ३६,४७0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर म्हणजेच खरेदीसाठी ५९,000 रुपये शेकडा आणि विक्रीसाठी ६0,000 रुपये शेकडा असा कायम राहिला.

Web Title: Gold remains stable due to retail demand, silver remains strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.