lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सणासुदीच्या मागणीने सोन्याचा भाव वधारला

सणासुदीच्या मागणीने सोन्याचा भाव वधारला

नऊ दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी सोन्याच्या भावात २३० रुपयांनी सुधारणा होऊन २८,२६० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला

By admin | Published: August 27, 2014 01:46 AM2014-08-27T01:46:51+5:302014-08-27T01:46:51+5:30

नऊ दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी सोन्याच्या भावात २३० रुपयांनी सुधारणा होऊन २८,२६० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला

Gold prices rose on the demand of festive demand | सणासुदीच्या मागणीने सोन्याचा भाव वधारला

सणासुदीच्या मागणीने सोन्याचा भाव वधारला

नवी दिल्ली : नऊ दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी सोन्याच्या भावात २३० रुपयांनी सुधारणा होऊन २८,२६० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सध्याच्या पातळीवरून व्यापाऱ्यांनी केलेल्या खरेदीमुळे ही तेजी नोंदली गेली. तसेच औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांकडून चांगली मागणी झाल्याने चांदीचा भावही ४०० रुपयांनी वधारून ४३,००० रुपये प्रतिकिलो झाला.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने दोन महिन्यांची नीचांकी पातळी गाठल्याने गेल्या ९ दिवसांपासून सोन्याच्या भावातही घसरण सुरू होती. याला सणासुदीच्या खरेदीमुळे लगाम बसला. याचा बाजारधारणेवर सकारात्मक परिणाम झाला. सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव १ टक्क्याने वाढून १,२८९.०६ डॉलर प्रतिऔंस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)





 

Web Title: Gold prices rose on the demand of festive demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.