lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘फिक्की फ्रेम २०१८’ : प्रिंट मीडिया वाढतच राहणार - देवेंद्र दर्डा

‘फिक्की फ्रेम २०१८’ : प्रिंट मीडिया वाढतच राहणार - देवेंद्र दर्डा

वर्तमानपत्रांच्या कॉपीत मागील १० वर्षांत २.३७ कोटींची वाढ झाल्याचे आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशननेच प्रमाणित केले आहे. अशावेळी येत्या काळात डिजिटल मीडियासुद्धा वाढतच जाईल. पण डिजिटल प्रिंटला कधीच पर्याय ठरू शकणार नाही. डिजिटल मीडिया कितीही वाढला तरी प्रिंट मीडियादेखील तितकाच वाढत जाईल, असे मत ‘लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:37 AM2018-03-09T02:37:39+5:302018-03-09T02:37:39+5:30

वर्तमानपत्रांच्या कॉपीत मागील १० वर्षांत २.३७ कोटींची वाढ झाल्याचे आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशननेच प्रमाणित केले आहे. अशावेळी येत्या काळात डिजिटल मीडियासुद्धा वाढतच जाईल. पण डिजिटल प्रिंटला कधीच पर्याय ठरू शकणार नाही. डिजिटल मीडिया कितीही वाढला तरी प्रिंट मीडियादेखील तितकाच वाढत जाईल, असे मत ‘लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले.

 'FICCI frame 2018': Print media will continue to grow - Devender Darda | ‘फिक्की फ्रेम २०१८’ : प्रिंट मीडिया वाढतच राहणार - देवेंद्र दर्डा

‘फिक्की फ्रेम २०१८’ : प्रिंट मीडिया वाढतच राहणार - देवेंद्र दर्डा

मुंबई - वर्तमानपत्रांच्या कॉपीत मागील १० वर्षांत २.३७ कोटींची वाढ झाल्याचे आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशननेच प्रमाणित केले आहे. अशावेळी येत्या काळात डिजिटल मीडियासुद्धा वाढतच जाईल. पण डिजिटल प्रिंटला कधीच पर्याय ठरू शकणार नाही. डिजिटल मीडिया कितीही वाढला तरी प्रिंट मीडियादेखील तितकाच वाढत जाईल, असे मत ‘लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले.
देशभरातील उद्योग क्षेत्रातील अव्वल संघटना असलेल्या फेडरेशन आॅफ इंडियन चेम्बर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीची ‘फिक्की फ्रेम २०१८’ ही परिषद मुंबईत झाली. त्यामध्ये प्रसारमाध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबाबत ‘पास्ट परफेक्ट फ्युचर टेन्स? कॅटालिस्ट अ‍ॅण्ड पॉइंटर्स फॉर द प्रिंट इंडस्ट्री’ या विषयावरील चर्चासत्रात देवेंद्र दर्डा यांनी विषय मांडताना प्रिंट मीडियाचे महत्त्व अधोरेखित केले.
ते म्हणाले, अलीकडेच जाहीर झालेल्या इंडियन रीडरशिप सर्व्हे २०१७नुसार देशातील ४७ कोटी वाचक ३० वर्षांखालील आहेत. प्रिंट मीडियाची वाचकसंख्या भाषा, लिंग, वय, भौगोलिक क्षेत्र तथा सामाजिक-आर्थिक अशा सर्वच घटकांमध्ये वाढ दर्शवली आहे. डिजिटल हे प्रसारमाध्यमांचे मिश्रण ठरू शकते. त्याचा प्रिंटवर परिणाम होणार नाही. साक्षरता व जाहिरातींवरील खर्च यांच्यातील वाढ ही जीडीपीच्या वाढीइतकीच असते. अशावेळी मीडियावर होणारा खर्च प्रिंटच्या वाढीसाठी पोषक असेल. यामुळे डिजिटल मीडिया प्रिंटला पूरक
असेल. त्यामुळे प्रिंट मीडिया वाढणार नाही हा दृष्टीकोन बदलणे
गरजेचे आहे, असे मत देवेंद्र दर्डा यांनी मांडले.
डीडीबी मुद्रा ग्रुपचे अध्यक्ष सत्यमूर्ती एन.पी. म्हणाले, ९०च्या दशकात जेव्हा सॅटेलाइट वाहिन्या आल्या, तेव्हा प्रिंट मीडिया संपेल, असे बोलले जात होते. त्यानंतर रेडिओ वाहिन्या व अन्य मीडिया आला, पण प्रिंट मीडिया कायमच आहे. टीव्हीवरील जाहिरात मुंबईसारख्या शहरात २ लाख प्रेक्षकांकडून एकदाच पाहिली जाते. पण ती प्रिंटला दिल्यास टीव्हीच्या तुलनेत वाचकवर्ग हा इंग्रजी दैनिकांत दहापट तर प्रादेशिक दैनिकांत २० पट अधिक असतो. त्यामुळे डिजिटल मीडिया टीव्हीला पर्याय असेल. म्हणूनच मीडिया ग्रुप वाचक व प्रेक्षक यांना जोडण्यासाठी डिजिटल व प्रिंटचा संयुक्त पर्याय देत आहेत. दैनिक जागरणचे सीईओ आणि एडिटर इन चीफ संजय गुप्ता यांनीही डिजिटल हा प्रिंटला पर्याय नसेल, असे मत मांडले. डिजिटल हा प्रिंट माध्यमांचा संपादकीय विस्तार आहे. डिजिटल आणि प्रिंटची स्पर्धा नाही. दोघांचेही वेगळे महत्त्व आहे. प्रिंट मीडियाला कुठलेच अन्य माध्यम पर्याय ठरू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्न्स्ट अ‍ॅण्ड यंगचे
भागीदार आशिष फेरवानी या चर्चेचे सूत्रधार होते.
 

Web Title:  'FICCI frame 2018': Print media will continue to grow - Devender Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.