lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एफडी, पीपीएफहून प्रॉव्हिडंट फंड सरस

एफडी, पीपीएफहून प्रॉव्हिडंट फंड सरस

(ईपीएफओ) सदस्यांना यंदा चलनवाढीच्या दराहून अधिक दराने व्याज मिळाल्याने पाच कोटींहून अधिक कामगार-कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

By admin | Published: December 30, 2014 01:09 AM2014-12-30T01:09:14+5:302014-12-30T01:09:14+5:30

(ईपीएफओ) सदस्यांना यंदा चलनवाढीच्या दराहून अधिक दराने व्याज मिळाल्याने पाच कोटींहून अधिक कामगार-कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

FD, provident fund mustard from PPF | एफडी, पीपीएफहून प्रॉव्हिडंट फंड सरस

एफडी, पीपीएफहून प्रॉव्हिडंट फंड सरस

नवी दिल्ली : वर्ष २००८-०९ मधील जागतिक आर्थिक मंदीनंतर प्रथमच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना यंदा चलनवाढीच्या दराहून अधिक दराने व्याज मिळाल्याने पाच कोटींहून अधिक कामगार-कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अलीकडेच प्रॉव्हिडंट फंडाच्या सदस्यांना त्यांच्या खात्यातील जमा रकमेवर वर्ष २०१४-१५ साठी ८.७५ टक्के दराने व्याज देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. खरे तर परताव्याचा हा दर या वर्षात व्यापारी बँकांमधील मुदत ठेवी आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावर (पीपीएफ) मिळालेल्या व्याजाहून अधिक आहे. गेली पाच वर्षे औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक मूल्याधारित महागाईचा दर (सीपीआय-आयडब्यू) १० टक्क्यांच्या आसपास होता. २०१४-१५ मध्ये आॅक्टोबरपर्यंत हा दर ६.५ टक्क्यांपर्यंत कमी झाला. म्हणजेच या वर्षात महागाई सरासरी ६.५ टक्के दराने वाढली व प्रॉ. फंडावर त्याहून अधिक म्हणजे ८.७५ टक्के एवढा परतावा मिळाला. २००८-०९ व २०१३-१४ मध्ये महागाई दर प्रॉ. फंडावरील व्याजाहून जास्त होता. २०१०-११ मध्ये प्रॉ. फंडाचा व्याजदर याहून जास्त ९.५ टक्के होता; पण महागाईचा सरासरी दर त्याहून जास्त १०.४३ टक्के राहिल्याने प्रत्यक्षात गुंतवणूक मूल्याचा ऱ्हास झाला होता. प्रॉ. फंडातील गुंतवणुकीचा फायदा असा की त्यावर कलम ८० सी अन्वये प्राप्तीकरात सूट मिळते. ही सूट पैसे ठेवताना, तिच्यात वाढ होताना व ती काढताना अशी तिन्ही टप्प्यांना मिळते. बँकांमधील दीर्घमुदतीच्या ठेवी ठराविक मर्यादेपर्यंत करमुक्त असल्या तरी त्यावर मिळणारे वर्षाचे १० हजारांहून अधिकचे व्याज मात्र करपात्र असते. साधारणपणे प्रॉ. फंडावर पीपीएफच्या तुलनेत जास्त परतावा मिळतो.(लोकमत न्यूज नेटवर्क)

च्वर्ष २०११-१२ मध्ये स्टेट बँकेतील पाच वर्षांच्या मुदत ठेवीचा व्याजदर ९.११ टक्के होता, तर प्रॉ. फंडावरील व्याज ८.५ टक्के होते. त्यानंतरच्या दोन वर्षांत स्टेट बँकेचा पाच वर्षांच्या ठेवींवरील व्याजदर अनुक्रमे ८.६५ टक्के व ८.८३ टक्के होता व प्रॉ. फंडावरील व्याजदर अनुक्रमे ८.५० टक्के व ८.७५ टक्के होता.

च्वरकरणी बँक ठेवी फायद्याच्या वाटल्या तरी चलनवाढ व प्राप्तीकर आकारणी यांचा विचार करता या तीन वर्षांतही बँकांच्या ठेवींहून प्रॉ. फंडानेच अधिक वास्तव परतावा दिला, असे चित्र दिसते.

Web Title: FD, provident fund mustard from PPF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.