lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इक्विटी म्युच्युअल फंडात आॅगस्टमध्ये विक्रमी गुंतवणूक, २०,३६२ कोटी रुपयांची गुंतवणूक

इक्विटी म्युच्युअल फंडात आॅगस्टमध्ये विक्रमी गुंतवणूक, २०,३६२ कोटी रुपयांची गुंतवणूक

सेबीने वेळोवेळी केलेली जागरूकता आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा जोखीम उचलण्याकडे वाढलेला कल, यामुळे आॅगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे. एकाच महिन्यात गुंतवणूकदारांनी २० हजार ३६२ कोटी रुपये गुंतविले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:57 AM2017-09-12T00:57:41+5:302017-09-12T00:57:50+5:30

सेबीने वेळोवेळी केलेली जागरूकता आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा जोखीम उचलण्याकडे वाढलेला कल, यामुळे आॅगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे. एकाच महिन्यात गुंतवणूकदारांनी २० हजार ३६२ कोटी रुपये गुंतविले आहेत.

Equity mutual funds invest in record investment of Rs 20,362 crores in August | इक्विटी म्युच्युअल फंडात आॅगस्टमध्ये विक्रमी गुंतवणूक, २०,३६२ कोटी रुपयांची गुंतवणूक

इक्विटी म्युच्युअल फंडात आॅगस्टमध्ये विक्रमी गुंतवणूक, २०,३६२ कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली : सेबीने वेळोवेळी केलेली जागरूकता आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा जोखीम उचलण्याकडे वाढलेला कल, यामुळे आॅगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे. एकाच महिन्यात गुंतवणूकदारांनी २० हजार ३६२ कोटी रुपये गुंतविले आहेत.
असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या संघटनेच्या आकडेवारीनुसार इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढण्याचा हा सलग १७वा महिना आहे. यापूर्वी मार्च २०१६ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडातून १,३७० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे, अशा योजना, ज्यात सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी गुंतविलेला पैसा म्युच्युअल फंड कंपनी शेअर बाजारात गुंतविते. ही जोखमीची गुंतवणूक मानली जाते.

नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेत चलन वाढले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे म्युच्युअल फंडाकडे ओघ वाढला आहे. एसआयपीद्वारे फंडात गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल आहे.

शेअर बाजार सध्या तेजीच्या वातावरणात आहे. त्यातच म्युच्युअल फंडांचीही गुंतवणूक शेअर बाजारात वाढली आहे.
- राहुल पारीख,
बजाज कॅपिटल

गेल्या तीन वर्षांमध्ये शेअर बाजरात सर्वसामन्यांची गुंतवणूक वाढली आहे. विशेष म्हणजे, नोटाबंदीनंतर म्युच्युअल फंडात आणि त्यातही इक्विटी फंडात गुंतवणूक वाढल्याचे दिसून आले आहे.
- कौस्तुभ बेलापूरकर,
मॉर्निंगस्टार


आॅगस्टमधील भरघोस गुंतवणुकीमुळे इक्विटी म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 6.44 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी ही गुंतवणूक 6.30 लाख कोटी रुपयांवर होतील.

Web Title: Equity mutual funds invest in record investment of Rs 20,362 crores in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत