lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चालू वित्त वर्षांत रोजगारांमध्ये होणार १५ टक्के वाढ

चालू वित्त वर्षांत रोजगारांमध्ये होणार १५ टक्के वाढ

कंपन्यांचा अंदाज; किमान अनुभव पुरेसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:09 AM2018-05-23T00:09:34+5:302018-05-23T00:09:34+5:30

कंपन्यांचा अंदाज; किमान अनुभव पुरेसा

Employment will increase by 15 percent in the current financial year | चालू वित्त वर्षांत रोजगारांमध्ये होणार १५ टक्के वाढ

चालू वित्त वर्षांत रोजगारांमध्ये होणार १५ टक्के वाढ

कोलकता : चालू वित्त वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या म्हणजेच श्रमशक्ती १५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज देशातील विभिन्न उद्योगांशी संबंधित बड्या कंपन्यांनी व्यक्त केला आहे. जिनिअस कन्सल्टंट लिमिटेड या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. जिनिअस कन्सल्टंटने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४२ टक्के कंपन्यांनी कर्मचारी संख्येत १५ टक्के वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वेक्षणात तब्बल ८८१ कंपन्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यात सीमेन्स इंडिया, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, बार्कले, ग्लॅक्सो, एडेलवाईस, शापूरजी पालनजी यासारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. मार्चच्या पहिल्या सप्ताहात हे सर्वेक्षण जिनिअस कन्सल्टंटने सुरू केले होते. ते पूर्ण होण्यास अडीच महिन्यांचा कालावधी लागला. संपूर्ण भारतातील कंपन्यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले होते.

जॉब पोर्टलमार्फतच

सर्वेक्षणात म्हटले आहे की, २०१८-१९ या वित्त वर्षात पुरुष आणि महिलांच्या भरतीचे प्रमाण अनुक्रमे ५७.७७ टक्के आणि ४२.२३ टक्के राहण्याची शक्यता आहे. २१ टक्के कंपन्यांना वाटते की, यंदा जॉब पोर्टल मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा पुरवठा करील. ३५.१७ टक्के कंपन्यांनी म्हटले की, एक ते पाच वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना २०१८-१९ मध्ये नोकºयांच्या सर्वाधिक संधी मिळतील. ६८.२५ टक्के कंपन्यांनी सांगितले की, भरती करण्यापूर्वी उमेदवाराची पार्श्वभूमी तपासून पाहणे अजूनही महत्त्वपूर्ण आहे.

Web Title: Employment will increase by 15 percent in the current financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी