lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कुंभमेळा कालावधीत नदीवरील पॅन्ट्रन ब्रीजबाबत चाचपणी

कुंभमेळा कालावधीत नदीवरील पॅन्ट्रन ब्रीजबाबत चाचपणी

अलाहाबाद कुंभमेळ्याच्या धर्तीवर प्रयोग : कमिटीकडून पाहणी

By admin | Published: August 26, 2014 10:08 PM2014-08-26T22:08:22+5:302014-08-27T00:43:01+5:30

अलाहाबाद कुंभमेळ्याच्या धर्तीवर प्रयोग : कमिटीकडून पाहणी

During the Kumbh Mela period, scrutiny of the river pentry bridge | कुंभमेळा कालावधीत नदीवरील पॅन्ट्रन ब्रीजबाबत चाचपणी

कुंभमेळा कालावधीत नदीवरील पॅन्ट्रन ब्रीजबाबत चाचपणी

अलाहाबाद कुंभमेळ्याच्या धर्तीवर प्रयोग : कमिटीकडून पाहणी
नाशिक : अलाहाबाद येथील कुंभमेळा कालावधीत गर्दीवरील नियंत्रणासाठी नदीवर वापरण्यात आलेली पॅन्ट्रन ब्रीज प्रणाली नाशिकमध्ये गोदावरी नदीवर वापरता येईल का यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंहस्थ आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली़ तसेच गोदावरी नदीवर अशा प्रकारचे पॅन्ट्रन ब्रीज कुठे करता येतील याबाबत समितीने आढावा घेतल्याची माहिती मेळा अधिकारी महेश पाटील यांनी दिली़
सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही पर्वणीकाळात स्नानासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात़ या भाविकांमुळे होणार्‍या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पॅन्ट्रन ब्रीजची संकल्पना गोदावरीवर साकार होऊ शकते का याबाबत आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली़ अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात अशा प्रकारच्या पेन्ट्रन ब्रीजचा वापर गर्दीच्या व्यवस्थापनासाठी करण्यात आला होता़ नाशिक कुंभमेळा नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांचे एक पथक अलाहाबादच्या कुंभमेळ्यात गेले होते़
सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व विभागांची आढावा बैठक झाली़ या बैठकीत त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तसेच तेथे करण्यात येणार्‍या घाटाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली़ कुशावर्तावर साधूंची, तर घाटावर नागरिकांची स्नानाची सोय करण्यात येणार आहे़ यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये गोरक्षनाथ आश्रम तसेच उदासी आखाड्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शविली असून, त्यावर घाट विकसित करण्यात येणार आहे़ गत सिंहस्थ कुंभमेळ्यात २२० मीटरचे घाट विकसित करण्यात आले होते. यावेळी १००० ते ११०० मीटर घाट विकसित करण्यात येणार आहे़
सिंहस्थ कालावधीसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर समितीने काही मागण्या केल्या असून, त्यामध्ये दर्शनबारीची दुरुस्ती, मंदिरात वातानुकूलन व्यवस्था, मंदिरातील अंतर्गत विद्युत दुरुस्ती, पोलिसांसाठीचे शेड आदिंचा समावेश आहे़ सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नागरिकांच्या आरोग्यासाठी पुरविण्यात येणार्‍या सोयीसुविधांबाबत आरोग्य उपसंचालकांनी आढावा घेतला, तर बीएसएनएल, पुरातत्व विभाग आदि अधिकार्‍यांनी आपल्या कामाचा आढावा सादर केला़ या बैठकीला सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: During the Kumbh Mela period, scrutiny of the river pentry bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.