lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दीपक कोचर यांच्या कंपनीला मॉरिशसमधून मिळाला पैसा, प्राप्तिकर विभाग घेणार माहिती

दीपक कोचर यांच्या कंपनीला मॉरिशसमधून मिळाला पैसा, प्राप्तिकर विभाग घेणार माहिती

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या वादग्रस्त नूपॉवर रिन्यूएबल्स कंपनीत मॉरिशसमधील फर्स्ट लँड होल्डिंग या कंपनीने ३२५ कोटी रुपये गुंतविल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्राप्तिकर खाते मॉरिशसशी संपर्क साधून तपशील मागविणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:10 AM2018-04-05T01:10:51+5:302018-04-05T01:10:51+5:30

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या वादग्रस्त नूपॉवर रिन्यूएबल्स कंपनीत मॉरिशसमधील फर्स्ट लँड होल्डिंग या कंपनीने ३२५ कोटी रुपये गुंतविल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्राप्तिकर खाते मॉरिशसशी संपर्क साधून तपशील मागविणार आहे.

Deepak Kochhar's company will get money from the Mauritius, the income tax department will take the information | दीपक कोचर यांच्या कंपनीला मॉरिशसमधून मिळाला पैसा, प्राप्तिकर विभाग घेणार माहिती

दीपक कोचर यांच्या कंपनीला मॉरिशसमधून मिळाला पैसा, प्राप्तिकर विभाग घेणार माहिती

नवी दिल्ली - आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या वादग्रस्त नूपॉवर रिन्यूएबल्स कंपनीत मॉरिशसमधील फर्स्ट लँड होल्डिंग या कंपनीने ३२५ कोटी रुपये गुंतविल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्राप्तिकर खाते मॉरिशसशी संपर्क साधून तपशील मागविणार आहे.
व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांनी दीपक कोचर यांच्या कंपनीत देणगी स्वरूपात गुंतवणूक केलेली असून त्याबदल्यात चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला ३,२५0 कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप आहे. दीपक कोचर यांच्या याच कंपनीत मॉरिशसमधील फर्स्ट लँड होल्डिंग या कंपनीने २0१0-१२ या काळात कंपल्सरी कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्सच्या स्वरूपात गुंतवणूक केल्याची बाब आता समोर आली आहे. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने न्यूपॉवर आणि दीपक कोचर यांना कलम १३१ अन्वये नोटीस बजावली असून, देशविदेशातील गुंतवणुकीचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे.

भारताचा मॉरिशससोबत करविषयक करार आहे.
त्या अंतर्गत मॉरिशसकडूनही माहिती मागविण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अद्याप तपासाची परवानगी नाही

व्हिडीओकॉन उद्योग समूहाला आयसीआयसीआय बँकेने दिलेल्या ३,२५0 कोटी रुपयांच्या कर्जाचा तपास करण्याची परवानगी गंभीर घोटाळा चौकशी कार्यालयाने (एसएफआयओ) कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे मागितली आहे. तथापि, मंत्रालयाने अजून तपासाची परवानगी दिलेली नाही, असे सांगण्यात आले. कंपनी व्यवहार मंत्रालयाने मात्र आमच्याकडे चौकशीसाठी अद्याप परवानगी मागण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. एका जागल्याने गेल्या महिन्यात एक पत्र एसएफआयओच्या मुंबई कार्यालयाला पाठविले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यालयाने कंपनी व्यवहार मंत्रालयाला गेल्या आठवड्यात एक पत्र पाठवून तपासाची परवानगी मागितली होती. सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणातील रक्कम मोठी असून सार्वजनिक पैशांचा मुद्दा असल्यामुळे कार्यालयाने यात लक्ष घातले आहे.
 

Web Title: Deepak Kochhar's company will get money from the Mauritius, the income tax department will take the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.