lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मागणी घटल्याने सोन्याच्या भावात घट

मागणी घटल्याने सोन्याच्या भावात घट

जागतिक बाजारात तेजीचा कल असताना शुक्रवारी स्थानिक सराफ्यात घसरण नोंदली गेली. आज सोन्याचा भाव ६० रुपयांनी घटून २६,३१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

By admin | Published: March 20, 2015 11:35 PM2015-03-20T23:35:11+5:302015-03-20T23:35:11+5:30

जागतिक बाजारात तेजीचा कल असताना शुक्रवारी स्थानिक सराफ्यात घसरण नोंदली गेली. आज सोन्याचा भाव ६० रुपयांनी घटून २६,३१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

Decrease in demand in gold prices | मागणी घटल्याने सोन्याच्या भावात घट

मागणी घटल्याने सोन्याच्या भावात घट

नवी दिल्ली : जागतिक बाजारात तेजीचा कल असताना शुक्रवारी स्थानिक सराफ्यात घसरण नोंदली गेली. आज सोन्याचा भाव ६० रुपयांनी घटून २६,३१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तथापि, चांदीच्या शिक्क्यांचा भाव ३५० रुपयांनी उंचावून ३६,५५० रुपये प्रतिकिलो राहिला.
सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या पातळीवर मागणी घटल्याने सोन्याच्या भावात स्थानिक बाजारात ही घट नोंदली गेली आहे. दुसरीकडे जागतिक बाजारात सोन्याला तेजीची झळाळी मिळाली. यामुळे स्थानिक सराफ्यातील घसरणीला काहीसा लगाम बसला.
न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव ०.३५ टक्क्यांनी वधारून १,१७१ डॉलर प्रतिऔंस राहिला. चांदीचा भावही १.३८ टक्क्यांच्या तेजीने १६.११ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
दुसरीकडे तयार चांदीचा भाव ३५० रुपयांनी वाढून ३६,५५० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३५५ रुपयांच्या तेजीसह ३६,२६५ रुपये प्रतिकिलोवर आला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरिता ५५,००० रुपये व ५६,००० रुपये प्रतिशेकड्यावर स्थिर राहिला.
शनिवारी गुढीपाडवा असून, त्यानिमित्त सोन्या-चांदीच्या बाजारात लगबग वाढलेली असेल. पाडव्याला सोने खरेदी करणे शुभ समजले जाते.

४नवी दिल्ली येथे ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ६० आणि १० रुपयांनी घटूून अनुक्रमे २६,३१५ रुपये व २६,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम राहिला.
४यात काल ३७५ रुपयांची वाढ नोंदली गेली होती. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,६०० रुपयांवर कायम राहिला.

Web Title: Decrease in demand in gold prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.