lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गृहकर्ज फेडताना घ्या खबरदारी...

गृहकर्ज फेडताना घ्या खबरदारी...

स्वत:च्या मालकीचे छोटेसे का होईना घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते

By admin | Published: April 30, 2016 03:16 AM2016-04-30T03:16:11+5:302016-04-30T03:16:11+5:30

स्वत:च्या मालकीचे छोटेसे का होईना घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते

Borrowing to pay home loan | गृहकर्ज फेडताना घ्या खबरदारी...

गृहकर्ज फेडताना घ्या खबरदारी...

रिना चव्हाण,
स्वत:च्या मालकीचे छोटेसे का होईना घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु घरांच्या दिवसेंदिवस
वाढणाऱ्या किमती पाहता एकमुठी रकमेत घर खरेदी करणे तसे कठीणच. कारण आपण घरासाठी
रक्कम साठवायचे म्हटले तरी ठरावीक रक्कम साठेपर्यंत घराच्या किमतीत
आणखीन वाढ झालेली असते. त्यामुळे बरेच जण गृहकर्ज घेण्यास प्राधान्य देतात.
पण कर्ज म्हणून घेण्यात येणाऱ्या रकमेचा आकडा मोठा असल्याने ते परत करण्यासाठी त्यासंबंधी आधीच विचार करावा. कारण वाढत्या गरजा, जबाबदाऱ्या व कोणतीही आपत्कालीन परिस्थिती अचानक उद्भवू शकते, अशा परिस्थितीत संबंधित वित्तीय संस्थेला गृहकर्ज परत कसे करायचे हा समस्येचा विषय होऊ शकतो. जेणेकरुन कोणतेही आर्थिक संकट आले तरी तुमच्या आयुष्यात त्याचा फारसा परिणाम होणार नाही. त्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा.
आपत्कालीन
स्थितीसाठी तयार
आजारपण किंवा अन्य कोणतीही परिस्थिती अचानक उद्भवू शकते. याचा गांभीर्याने विचार करता सहा महिन्यांच्या खर्चाबरोबर ईएमआयची रक्कम वेगळीच जमा करा. जेणेकरुन ईएमआय भरताना वा भरल्यानंतर तुमची आर्थिक कसरत तरी होणार नाही.
आर्थिक लक्ष्य ठरवा :

गृहकर्ज कमी कालावधीबरोबर जास्त काळासाठीसुद्धा घेता येते. त्यामुळे तुम्हाला कोणत्या स्वरुपाचे गृहकर्ज घ्यायचेय हे निश्चित करा. कारण हे निश्चित नसल्यामुळेही तुम्ही अडचणीत येऊ शकता. तसेच दैनंदिन खर्चाच्या नियंत्रणाच्या अभावामुळेसुद्धा तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकाते. तुमचा दैनंदिन खर्च पगारापेक्षा जास्त असेल ता तो टाळण्यासाठी प्रयत्न करा. आर्थिक खर्चामध्ये मुलांचे शिक्षण, क्रेडिट कार्डची उधारी, औषधोपचार किंवा रिटायमेंटसाठी वेगळी बचत करणे अशा गोष्टींचा संभव असू शकतो. त्यामुळे हे निश्चित करा की गृहकर्जाच्या मासिक ईएमआयचा वापर अन्य खर्चासाठी होऊ नये.

Web Title: Borrowing to pay home loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.