lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाप्पा, जीएसटी रिटर्नच्या सोप्या पद्धती घेऊन या !

बाप्पा, जीएसटी रिटर्नच्या सोप्या पद्धती घेऊन या !

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ५ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. गणपतीचा संपूर्ण कालावधी जीएसटीचे फॉर्म ३बी आणि जीएसटीआर-१ दाखल करण्यातच जात आहे, तर आता पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:23 AM2017-09-04T01:23:15+5:302017-09-04T01:24:29+5:30

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ५ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. गणपतीचा संपूर्ण कालावधी जीएसटीचे फॉर्म ३बी आणि जीएसटीआर-१ दाखल करण्यातच जात आहे, तर आता पुढे काय?

 Bappa, come with simple methods of GST return! | बाप्पा, जीएसटी रिटर्नच्या सोप्या पद्धती घेऊन या !

बाप्पा, जीएसटी रिटर्नच्या सोप्या पद्धती घेऊन या !

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ५ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. गणपतीचा संपूर्ण कालावधी जीएसटीचे फॉर्म ३बी आणि जीएसटीआर-१ दाखल करण्यातच जात आहे, तर आता पुढे काय?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जुलै महिन्याचे फॉर्म ३बी भरून झालेला आहे. ज्या करदात्यांनी उशिरा फॉर्म ३बी भरला, त्यांनी लेट फीदेखील भरली, परंतु १ सप्टेंबरला सरकारने एक परिपत्रक जारी केले. त्यानुसार, आता उशिरा फॉर्म 3बी भरणाºया करदात्यावर लेट फी लागू होणार नाही, परंतु ज्यांनी आधीच लेट फी भरली आहे, त्याबद्दल काही स्पष्टीकरण अजून आलेले नाही, तसेच आॅगस्ट महिन्याचा फॉर्म 3बी २० सप्टेंबरपर्यंत दाखल करायचा आहे.
अर्जुन : फॉर्म जीएसटीआर-१ कधीपर्यंत दाखल करावा आणि त्यात कोणती माहिती द्यावयाची आहे?
कृष्ण : अर्जुना, प्रत्येक करदात्याला जुलैच्या फॉर्म जीएसटीआर-१मध्ये बिलानुसार संपूर्ण विक्रीची माहिती द्यावयाची आहे. फॉर्म 3बीमध्ये एकूण उलाढालीची माहिती दिली, परंतु जीएसटीआर-१मध्ये बिलानुसार विक्रीची माहिती द्यावी लागेल. फॉर्म 3बीमध्ये दाखल केलेला तपशील आणि फॉर्म जीएसटीआर-१ मध्ये दाखल केला जाणारा तपशील जुळवावा लागेल. जीएसटीआर-१ मध्ये मागील वर्षाची उलाढाल, तसेच चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून यामधील उलाढाल नमूद करावी लागणार आहे, तसेच जुलै महिन्यातील विक्रीची माहिती एचएसएन कोड अनुसार, माहिती, संख्या, करपात्र रक्कम व सीजीएसटी, एसजीएसटी, व आयजीएसटी याची रक्कम नमूद करावी लागत आहे. फॉर्म जीएसटीआर-१ हा ५ सप्टेंबरपर्यंत भरावा लागेल, तसेच आॅगस्ट महिन्याचा फॉर्म जीएसटीआर-१ २० सप्टेंबरपर्यंत भरावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, जुलैच्या जीएसटीआर-२मध्ये काय माहिती द्यायची आहे आणि तो कधीपर्यंत दाखल करायचा आहे?
कृष्ण : अर्जुना, जुलैचा जीएसटीआर-२ हा १० सप्टेंबरपर्यंत दाखल करायचा आहे, तसेच आॅगस्ट महिन्याचा जीएसटीआर-२ हा २५ सप्टेंबरपर्यंत दाखल करावा लागेल. त्यात संपूर्ण खरेदीची माहिती असेल. ती आॅटो पॉप्युलेट झालेली माहिती १० सप्टेंबरपर्यंत तपासावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, फॉर्म जीएसटीआर-३ कशाचा आहे ?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-१ आणि जीएसटीआर-२ भरून झाल्यावर, १५ सप्टेंबरपर्यंत जुलैचा उएऊफ- ३ दाखल करावा आणि ३० सप्टेंबरपर्यंत आॅगस्ट महिन्याचा फॉर्म जीएसटीआर-३ भरावा लागेल. करदात्याला जीएसटीआर-३मध्ये मासिक रिटर्न भरावे लागेल.
अर्जुन : हे करताना करदात्याला कोणत्या अडचणी येणार आहेत?
कृष्ण : अर्जुना, सप्टेंबर महिन्यात, जुलैचे रिटर्न दाखल करण्यासाठी ५, १०, १५, आणि आॅगस्टचे रिटर्न दाखल करण्यासाठी २०, २५, ३० सप्टेंबर आणि त्याचबरोबर आॅगस्ट महिन्याचा कर भरण्यासाठी २० तारीख अशा देय तारखा आहेत. त्यामुळे करदात्याची खूप धावपळ होणार आहे, जीएसटी मध्ये आयटीसी आणि आसीएमच्या किचकट तरतुदी असल्यामुळे, त्यावरही कम्प्युटराइज्ड सीस्टम असल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागेल.

-सी. ए. उमेश शर्मा

Web Title:  Bappa, come with simple methods of GST return!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.