lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘आयुष’मुळे मिळणार अडीच कोटी रोजगार

‘आयुष’मुळे मिळणार अडीच कोटी रोजगार

आयुष उद्योगातून २0२0पर्यंत २६ दशलक्ष (२.६ कोटी) लोकांना रोजगार मिळेल. त्यात १ कोटी प्रत्यक्ष, तर दीड कोटी अप्रत्यक्ष रोजगाराचा समावेश असेलb

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 03:56 AM2017-12-05T03:56:06+5:302017-12-05T03:57:19+5:30

आयुष उद्योगातून २0२0पर्यंत २६ दशलक्ष (२.६ कोटी) लोकांना रोजगार मिळेल. त्यात १ कोटी प्रत्यक्ष, तर दीड कोटी अप्रत्यक्ष रोजगाराचा समावेश असेलb

Aadhaar will get 2.5 crore jobs | ‘आयुष’मुळे मिळणार अडीच कोटी रोजगार

‘आयुष’मुळे मिळणार अडीच कोटी रोजगार

नवी दिल्ली : आयुष उद्योगातून २0२0पर्यंत २६ दशलक्ष (२.६ कोटी) लोकांना रोजगार मिळेल. त्यात १ कोटी प्रत्यक्ष, तर दीड कोटी अप्रत्यक्ष रोजगाराचा समावेश असेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे. आयुष क्षेत्रात २0२२पर्यंत तीन पट वाढ होईल, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या पारंपरिक उपचार पद्धती व आरोग्य सेवेला ^‘आयुष’ नावाने ओळखले जाते. प्रभू यांनी सांगितले की, भारतातील आयुषची बाजारपेठ ५00 कोटी रुपयांची आहे. या क्षेत्रातील निर्यात २00 कोटी रुपयांची आहे. तरुण उद्योजक या क्षेत्रात उतरत असून स्टार्ट-अपसाठी त्यात भरपूर संधी आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
‘आरोग्य २0१७’ या परिषदेत प्रभू यांनी सांगितले की, पारंपरिक औषधे सर्व देशांत पोहोचविण्यासाठी काम करण्यास सरकार प्रयत्नशील आहे. यात सर्वांचाच फायदा आहे. भारताची औषधी निर्यात वाढेल. तसेच अन्य देशांना पारंपरिक औषधे मिळतील. आयुष क्षेत्रात १00 टक्के विदेशी गुंतवणुकीला सरकारने परवानगी दिली आहे. या क्षेत्रातील संधीचा लाभ घेण्यासाठी सर्व संबंधितांनी आपल्या साधनांचा पुरेपूर वापर करावा. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले की, येत्या पाच वर्षांत आयुष क्षेत्राचा आकार तिपटीने वाढविण्यासाठी आपले मंत्रालय बांधील आहे.

प्रचंड वनस्पतींचे भांडार
भारतात ६,६00 औषधी
वनस्पतींचे भांडार आहे. आयुष
आणि वनस्पतीजन्य उत्पादने निर्यात करणारा भारत हा जगातील दुसºया क्रमांकाचा मोठा देश आहे. आम्ही आता भारतीय औषधींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. आयुष्य पायाभूत सेवांना भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रात समाविष्ट करण्याचाही आमचा
प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Aadhaar will get 2.5 crore jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.