lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोलापूर जिल्हा बँकेच्या ठेवीत ९०० कोटींची घसरण

सोलापूर जिल्हा बँकेच्या ठेवीत ९०० कोटींची घसरण

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्च २०१३ मध्ये उच्चांकी ३४७६ कोटी ४५ लाख २६ हजार ठेवी घटून नोव्हेंबर १४ महिन्यात २५८७ कोटी ६७ लाख ३३ हजारांवर आल्या आहेत

By admin | Published: December 25, 2014 12:19 AM2014-12-25T00:19:42+5:302014-12-25T00:19:42+5:30

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्च २०१३ मध्ये उच्चांकी ३४७६ कोटी ४५ लाख २६ हजार ठेवी घटून नोव्हेंबर १४ महिन्यात २५८७ कोटी ६७ लाख ३३ हजारांवर आल्या आहेत

900 crore fall in Solapur district bank | सोलापूर जिल्हा बँकेच्या ठेवीत ९०० कोटींची घसरण

सोलापूर जिल्हा बँकेच्या ठेवीत ९०० कोटींची घसरण

अरुण बारसकर, सोलापूर
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्च २०१३ मध्ये उच्चांकी ३४७६ कोटी ४५ लाख २६ हजार ठेवी घटून नोव्हेंबर १४ महिन्यात २५८७ कोटी ६७ लाख ३३ हजारांवर आल्या आहेत. दीड वर्षांत ८८८ कोटी ७७ लाख ९३ हजार रुपये इतक्या ठेवीची घट झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
सहकार क्षेत्रात पहिल्या तीन-चार सहकारी जिल्हा बँकेच्या यादीत काही वर्षांखाली सोलापूर जिल्ह्णाचे नाव होते. एक दर्जेदार व विश्वासू बँक म्हणून बँकेला नावलौकिक होता. जिल्ह्यात नागरी बँका तसेच पतसंस्थांची संख्या वाढत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवीला फार असा धक्का लागला नव्हता.
संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप तसेच गैरव्यवहारामुळे काही नागरी बँका तसेच पतसंस्था आर्थिक अडचणीत आल्या असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील विश्वास तसुभरही कमी झाला नव्हता. त्यामुळेच जिल्हा बँकेच्या ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. परंतु चुकीच्या पद्धतीने, विनातारण कर्ज मोठ्या प्रमाणावर घेतलेले कर्ज संचालकांनीच थकविल्याने जिल्हा बँक अडचणीत आली. यातच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची अडचण झाली व न्यायालयातही हे प्रकरण गेले. याचाच फटका जिल्हा मध्यवर्ती बँकेला बसला असून वरचेवर ठेवी कमी होत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

Web Title: 900 crore fall in Solapur district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.