lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत ३० बैठकांत घेतले ९१८ निर्णय

जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत ३० बैठकांत घेतले ९१८ निर्णय

वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने दोन वर्षांत ३० वेळा बैठक घेतली. नव्या करपद्धतीशी संबंधित कायदे, नियम व कराचा दर याबाबत ९१८ निर्णय घेतले गेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:37 AM2018-10-29T05:37:41+5:302018-10-29T05:38:03+5:30

वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने दोन वर्षांत ३० वेळा बैठक घेतली. नव्या करपद्धतीशी संबंधित कायदे, नियम व कराचा दर याबाबत ९१८ निर्णय घेतले गेले.

9 18 decisions taken in 30 meetings in two years of GST conference | जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत ३० बैठकांत घेतले ९१८ निर्णय

जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत ३० बैठकांत घेतले ९१८ निर्णय

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने दोन वर्षांत ३० वेळा बैठक घेतली. नव्या करपद्धतीशी संबंधित कायदे, नियम व कराचा दर याबाबत ९१८ निर्णय घेतले गेले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका झाल्या. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंबंधी निवेदन जारी केले आहे.

या निवेदनानुसार, ९१८ निर्णयांपैकी ९६ टक्के निर्णयांची अंमलबजावणी केंद्र सरकारने केली आहे. त्यासाठी सरकारने २९४ अधिसूचना काढल्या. उर्वरीत निर्णय हे अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. जीएसटी हा केंद्र व राज्य या दोन सरकारांनी संयुक्तपणे राबविण्याचा कर असल्याने राज्य सरकारांनीही जवळपास तेवढ्याच अधिसूचना काढल्या. देशातील अप्रत्यक्ष कर व्यवस्थेशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे निर्णय घेत आहेत, अशा नव्या सहकारी सांघिक व्यवस्थेला मार्ग दाखवण्याचे काम ही परिषद करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: 9 18 decisions taken in 30 meetings in two years of GST conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.