lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात येणार ९०० विमाने

भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात येणार ९०० विमाने

नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक कंपन्या येत्या काही वर्षांत आपल्या ताफ्यात ९०० नवी विमाने सहभागी करून घेणार आहेत. यातील सर्वाधिक ४४८ विमाने इंडिगोच्या ताफ्यात येणार आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:47 AM2017-12-26T03:47:16+5:302017-12-26T03:47:26+5:30

नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक कंपन्या येत्या काही वर्षांत आपल्या ताफ्यात ९०० नवी विमाने सहभागी करून घेणार आहेत. यातील सर्वाधिक ४४८ विमाने इंडिगोच्या ताफ्यात येणार आहेत.

9 00 planes to fly Indian Airlines | भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात येणार ९०० विमाने

भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात येणार ९०० विमाने

नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक कंपन्या येत्या काही वर्षांत आपल्या ताफ्यात ९०० नवी विमाने सहभागी करून घेणार आहेत. यातील सर्वाधिक ४४८ विमाने इंडिगोच्या ताफ्यात येणार आहेत. जगात झपाट्याने वाढणा-या हवाई बाजारांत भारताचे स्थान वरचे आहे. त्यामुळे बहुतांश भारतीय कंपन्यांनी महत्त्वाकांक्षी विस्तार योजना हाती घेतल्या आहेत. नागरी उड्डयन मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, स्वस्त विमान सेवा देणा-या इंडिगो, स्पाईसजे, गोएअर, एअरएशिया या कंपन्या नवी विमाने आपल्या ताफ्यात आणत आहेत. अन्य काही विमान कंपन्याही विस्तार योजना राबवत आहेत. सर्व कंपन्या मिळून एकूण ९०० विमाने खरेदी करीत आहेत.
इंडिगोच्या ताफ्यात सध्या १५० विमाने आहेत. आणखी ४४८ विमाने आपल्या ताफ्यात आणण्यासाठी कंपनी सज्ज आहे. त्यातील ३९९ विमाने ए३२० आणि ४९ विमाने एटीआर जातीची आहेत. येत्या आठ वर्षांत ही विमाने कंपनीच्या ताफ्यात येतील. इंडिगोची मुख्य स्पर्धक कंपनी स्पाईसजेटच्या ताफ्यात सध्या ५७ विमाने आहेत. विस्तार योजनेत कंपनी बी७३७-८०० जातीची १०७ विमाने आणि बोम्बार्डिअर क्यू४०० जातीची ५० विमाने खरेदी करीत आहे. २०१८ ते २०२३ या काळात ही विमाने कंपनीच्या ताफ्यात सहभागी होतील. गोएअरकडून ए३२० जातीची ११९ विमाने २०१८-२०२२ या काळात खरेदी केली जाणार आहेत. सध्या कंपनीकडे ३४ विमाने आहेत.
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एअरएशियाकडून येत्या पाच वर्षांत ६० विमाने खरेदी केली जाणार आहेत. सध्या कंपनीच्या ताफ्यात १४ विमाने आहेत. जेट एअरवेजच्या ताफ्यात १०७ विमाने आहेत. विस्तार योजनेत कंपनी बी७३७-८ मॅक्स जातीची ८१ विमाने २०१८-२०२४ या काळात घेणार आहे. याशिवार मार्च २०१८पर्यंत कंपनीच्या ताफ्यात बी७३७-८०० जातीची पाच विमाने सहभागी होणार आहेत.

Web Title: 9 00 planes to fly Indian Airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.