lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयसीआयसीआयचे ६ टक्के शेअर्स घसरले

आयसीआयसीआयचे ६ टक्के शेअर्स घसरले

आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सोमवारी जवळपास ६ टक्क्यांनी घसरले. बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन ग्रृप यांच्यातील ४० हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचा सीबीआयने तपास सुरु केला आहे. त्याअंतर्गतच लवकरच चंदा कोचर यांना चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:42 AM2018-04-03T01:42:54+5:302018-04-03T01:42:54+5:30

आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सोमवारी जवळपास ६ टक्क्यांनी घसरले. बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन ग्रृप यांच्यातील ४० हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचा सीबीआयने तपास सुरु केला आहे. त्याअंतर्गतच लवकरच चंदा कोचर यांना चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

 6% of ICICI shares fell | आयसीआयसीआयचे ६ टक्के शेअर्स घसरले

आयसीआयसीआयचे ६ टक्के शेअर्स घसरले

मुंबई  - आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सोमवारी जवळपास ६ टक्क्यांनी घसरले. बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन ग्रृप यांच्यातील ४० हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचा सीबीआयने तपास सुरु केला आहे. त्याअंतर्गतच लवकरच चंदा कोचर यांना चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बँकेच्या शेअर्सचे बाजार मूल्य १०,४५२.८४ कोटी रुपयांनी कमी झाले. या पार्श्वभूमीवर बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी तातडीची बैठकही बोलवली होती. एनसीएलटीशी संबंधित प्रकरणी त्यात चर्चा झाली.
शेअर बाजारात नव्या वर्षाची दमदार सुरुवात
सोमवारी शेअर बाजारात नव्या वर्षाची दमदार सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८६.६८ अंकांनी वाढून ३३,२५५.३६ अंकांवर बंद झाला. गेल्या वर्षाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स २०५.७१ अंकांनी घसरला होता. राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी ९८.१० अंकांनी वाढून १०,२११.८० अंकांवर बंद झाला.

Web Title:  6% of ICICI shares fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.