lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५७ वित्तीय संस्थांना आता लागणार टाळे; आरबीआयची कारवाई

५७ वित्तीय संस्थांना आता लागणार टाळे; आरबीआयची कारवाई

केवायसी प्रक्रियेचे उल्लंघन केल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:05 AM2018-07-24T00:05:15+5:302018-07-24T00:06:06+5:30

केवायसी प्रक्रियेचे उल्लंघन केल्याने कारवाई

57 financial institutions now have to wait; RBI action | ५७ वित्तीय संस्थांना आता लागणार टाळे; आरबीआयची कारवाई

५७ वित्तीय संस्थांना आता लागणार टाळे; आरबीआयची कारवाई

मुंबई : खातेदारांची ‘केवायसी’ प्रक्रिया तंतोतंत पूर्ण करण्याचे दिशानिर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. असे असतानाही केवायसी नियमांचे पालन न करणाऱ्या तब्बल ४५ संस्थांची प्रमाणपत्रे रिझर्व्ह बँकेने शनिवारी रद्द केली होती. त्यामुळे या संस्था यापुढे कुठलेही वित्तीय
व्यवहार करू शकणार नाहीत. त्यामध्ये राज्यातील २९ संस्थांचा समावेश आहे. सोमवारीही रिझर्व्ह बँकेने पुन्हा १२ एनबीएफसींचे प्रमाणपत्र रद्द केले. या कारवाईत महाराष्टÑातील एकही संस्था नाही.
बँक अथवा बिगर बँक वित्त संस्थेतील (एनबीएफसी) खातेदारांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला आदींद्वारे ‘नो युअर कस्टमर’ अर्थात केवायसी प्रक्रिया पूर्ण
होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी संबंधित बँक अथवा एनबीएफसीची आहे.
पण प्रामुख्याने एनबीएफसींकडून या नियमाचे मोठ्या प्रमाणावर
उल्लंघन होत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळेच बँकेने मागील दोन दिवसात कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

राज्यातील २९ संस्थांचा समावेश
एकाच दिवशी ४५ एनबीएफसींचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यात मुंबई व ठाण्यातील २५ अशा संस्थांचा समावेश आहे.तसेच कोल्हापुरातील दोन व पुणे आणि अकोल्यातील प्रत्येकी एका संस्थेवरही ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्या राज्याबाहेरील १६ संस्था जम्मू, जालंधर व फगवाडा (पंजाब), कोलकाता, चेन्नई ठिकाणच्या आहेत.

Web Title: 57 financial institutions now have to wait; RBI action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.