lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > करकायद्याच्या १00 गोष्टी

करकायद्याच्या १00 गोष्टी

कृष्णा, आज करनीतीचे १00 भाग पूर्ण होत आहेत. या भागांमध्ये आयकर, व्हॅट, कंपनी कायदा, सर्व्हिस टॅक्स या सर्वांवर आपण चर्चा केलेली

By admin | Published: May 31, 2015 11:43 PM2015-05-31T23:43:10+5:302015-05-31T23:43:10+5:30

कृष्णा, आज करनीतीचे १00 भाग पूर्ण होत आहेत. या भागांमध्ये आयकर, व्हॅट, कंपनी कायदा, सर्व्हिस टॅक्स या सर्वांवर आपण चर्चा केलेली

100 things of taxation | करकायद्याच्या १00 गोष्टी

करकायद्याच्या १00 गोष्टी

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आज करनीतीचे १00 भाग पूर्ण होत आहेत. या भागांमध्ये आयकर, व्हॅट, कंपनी कायदा, सर्व्हिस टॅक्स या सर्वांवर आपण चर्चा केलेली आहे व पुढेही करीत राहू. यानिमित्त करकायद्यातील १00 गोष्टी ज्या सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. त्या सांग?
आयकर :
१) आयकरातील सर्व माहिती ६६६.्रल्लूङ्मेी३ं७्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर मिळते.
२) आयकरामध्ये उत्पन्न सॅलरी, हाउस प्रॉपर्टी, बिजनेस प्रोफेशन, कॅपीटल गेन व अदर सोर्सेस या पाच विभागांमध्ये येते.
३) पगारदार व्यक्तींनी आपल्या एम्प्लॉयरकडून फॉर्म १६ दरवर्षी घ्यावा.
४) आयकर रिटर्नमध्ये फॉर्म १६ व इतर उत्पन्नाच्या आधारे आयकर रिटर्न दाखल करावे.
५) ट्रान्सपोर्ट अलाउन्स आता दरमहा रु. १,६00पर्यंत करमाफ राहील.
६) हाउस प्रॉपर्टीच्या उत्पन्नावर ३0 टक्के स्टॅण्डर्ड डिडक्शन मिळते.
७) दुसरे घर भाड्याने दिले आहे असे गृहीत धरून त्याचे उत्पन्न घ्यावे लागते.
८) गृहकर्जाच्या व्याजाची सेल्फ आॅक्युपाईड असेल तर रु. २ लाखांची व दुसऱ्या घराची पूर्ण व्याजाची वजावट मिळते.
९) गृहकर्जाच्या प्रिन्सिपलची ८0 सीमध्ये रु. १.५ लाखपर्यंत वजावट मिळते.
१0) व्यापारात उलाढाल १ कोटीच्या वर असेल तर टॅक्स आॅडिट करून घ्यावे लागते.
११) प्रोफेशनल व्यक्तींसाठी टॅक्स आॅडिटची मर्यादा २५ लाख रुपये आहे.
१२) जर उलाढाल १ कोटीपेक्षा कमी असेल तर कलम ४४ ए डीमध्ये नफा ८ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दाखवता येईल. अन्यथा टॅक्स आॅडिट करावे लागेल.
१३) टॅक्स आॅडिट करून घ्यावयाची शेवटची तारीख ३0 सप्टेंबर आहे व रिटर्नचीही.
१४) कंपनी व ज्यांना टॅक्स आॅडिट लागू आहे असे करदाते सोडून इतर करदात्यांनी आयकर रिटर्न ३१ आॅगस्टपूर्वी दाखल करावे.
१५) ३१ मार्चला स्टॉक मोजून त्याचे योग्य व्हॅल्युएशन करावे.
१६) एका दिवशी एका व्यक्तीने रु. २0 हजारांच्या वर रोखीने खर्च करू नये.
१७) ट्रान्सपोर्टर्ससाठी रोखीने खर्च करण्याची मर्यादा रु. ३५ हजार आहे.
१८) कर्ज, ठेव किंवा अचल संपत्तीचे व्यवहार रु. २0 हजारांच्या वर रोखीने करू नये.
१९) धंद्याचा लॉस ८ वर्षे कॅरीफॉरवर्ड करता येतो.
२0) टॅक्स आॅडिट लागू असणाऱ्या वैयक्तिक करदात्यांंना विशिष्ट व्यवहारावर टीडीएस करावा लागतो.
२१) टीडीएस बुकिंग किंवा पेमेंट जे आधी त्यावर करावा लागतो.
२२) टीडीएसचे पेमेंंट महिना संपल्यावर पुढच्या महिन्याच्या ७ तारखेपर्यंत भरावे लागते.
२३) टीडीएसचे रिटर्न त्रैमासिक भरावे लागते.
२४) टीडीएसचे रिटर्न कितीही वेळेस रिव्हाईज करता येते.
२५) टीडीएस लागू होत असेल तर कपात करावे व भरावे.
२६) जर टीडीएस कपात केली नाही तर त्या खर्चाच्या ३0 टक्के वजावट मिळणार नाही.
२७) टीडीएस रिटर्न उशिरा दाखल केल्यास प्रत्येक दिवसासाठी रु. २00 लेट फीस भरावी लागते.
२८) कॅपिटल वस्तू ३ वर्षांनंतर ट्रान्सफर केल्यास लाँग टर्म कॅपिटल गेन होतो.
२९) साधारणत: लाँग टर्म कॅपिटल गेनवर २0 टक्के आयकर लागतो.
३0) शेअर्सच्या एसटीटी पेड लाँग टर्म कॅपिटल गेनवर आयकर लागत नाही.
३१) शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एसटीटी पेड असेल तर १५ टक्के आयकर लागतो.
३२) अचल संपत्तीच्या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी मूल्य किंवा विक्री किंमत जे जास्त असेल त्यावर कॅपिटल गेन लागेल.
३३) कंपनीकडून मिळालेले डिव्हिडंट करमाफ असते.
३४) शेती उत्पन्नावर आयकर लागत नाही.
३५) भेटवस्तू रु. ५0 हजारच्या वर मिळाली तर करपात्र ठरेल. याला काही अपवाद आहे.
३६) विल, वारसाहक्क किंवा लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंवर आयकर लागत नाही.
३७) ८0 सी, सीसीसी व सीसीडीची मर्यादा १ लाख ५0 हजार रु. आहे.
३८) मेडिकल इन्शुरन्सच्या प्रीमियमची २५ हजार रु.पर्यंत वजावट मिळेल.
३९) आई-वडिलांच्या मेडिकल इन्शुरन्सच्या प्रीमियमचीसुद्धा रु. २0 हजारपर्यंत वजावट मिळेल.
४0) सेव्हिंग खात्याच्या व्याजाची रु. १0 हजारपर्यंतची वजावट मिळते.
४१) १८ वर्षांखालील मुलाचे उत्पन्न त्यांच्या पॅरेंट्सच्या उत्पन्नात धरले जाते.
४२) प्रत्येक करदात्याने फॉर्म २६ ए एस तपासावा.
४३) अ‍ॅडव्हॉन्स टॅक्स व रिफंडची माहितीसुद्धा फॉर्म २६ ए एसमधून मिळते.
४४) जर २६ ए एस व आयकर रिटर्नमधील उत्पन्न यात तफावत असल्यास स्क्रुटीनी येऊ शकते.
४५) वैयक्तिक बेसिक एक्झेम्पशनची मर्यादा २0१५-१६ या वर्षासाठी रु. २.५0 लाख आहे.
४६) ६0 वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांसाठी ही रु. ३ लाख आहे.
४७) ८0 वर्षांवरील अति वरिष्ठ नागरिकांसाठी ही रु. ५ लाख आहे.
४८) जर आयकर वार्षिक रु. १0 हजारच्या वर येत असेल तर अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा.
४९) जर उत्पन्न रु. १ करोडच्या वरती असेल तर १२ टक्के सरचार्ज आकारला जातो.
५0) उत्पन्न जर बेसिक एक्झेम्पशनपेक्षा जास्त असेल तर रिटर्न भरावे लागते.
५१) पार्टनरशिप फर्म, कंपनी, एलएलपी इत्यादींना आयकर ३0 टक्केप्रमाणे लागतो.
५२) कंपनीसाठी मॅट व इतर करदात्यांसाठी अल्टरनेट मिनिमम टॅक्सचा दर १८.५ टक्के आहे.
५३) आयकर रिटर्नमध्ये सर्व बँक अकाउंटची माहिती द्यावी लागणार नाही.
५४) या वर्षापासून आयकर रिटर्नमध्ये विदेशी यात्रेची माहिती द्यावी लागणार नाही.
५५) आयकर रिटर्नमध्ये विदेशी मालमत्तेची माहिती द्यावी लागते.
५६) वैयक्तिक करपात्र उत्पन्न जर रु. ५ लाखांच्या आत असेल तर करामध्ये रु. २ हजारांची सवलत मिळते.
५७) आयकर रिटर्नमध्ये आधारकार्ड नमूद करावा लागेल.
५८) उत्पन्न जर ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर रिटर्न ई-फाईल करता येते.
५९) आयकरात मागील दोनच वर्षांचे रिटर्न ई -फाईल करता येते.
६0) करदात्याला पॅनकार्ड गरजेचे आहे मात्र ते ओळखपत्र म्हणून वापरू नये.
६१) वर्ष २0१४-१५पासून घसारा नवीन कायद्यामध्ये दिले त्याप्रमाणे करावे लागेल.
६२) डोमॅस्टीक ट्रान्सफर प्राइसिंग रु. २0 करोडपर्यंतच्या व्यवहारावर लागणार नाही.
व्हॅट :
६३) जर उलाढाल १0 लाख रुपयांच्या वर असेल तर व्हॅट रजिस्ट्रेशन कम्पलसरी आहे.
६४) व्हॅटचा दर १ टक्का, ५ टक्के, १२.५ टक्के, २0 टक्के व सीएसटीचा दर २ टक्के वस्तुंनुसार आहे.
६५) प्रत्येक वर्षी विभागाच्या ६६६.ेंँं५ं३.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवरून रिटर्नचा कालावधी तपासावा.
६६) मासिक, त्रैमासिक व सहा महिने असे कालावधी असतात.
६७) हा कालावधी संपल्यानंतर पुढील महिन्याच्या २१ तारखेपर्यंत व्हॅट भरावा व रिटर्न दाखल करावा.
६८) व्हॅट उशिरा भरला तर व्याज १.२५ टक्के प्रति महिनाप्रमाणे आकारले जाते.
६९) रिटर्न वेळेवर दाखल केले नाही तर रु. १ हजारची लेट फीस लागते.
७0) ३0 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला तर रु. ५ हजार लेट फीस भरावी लागते.
७१) प्लांट व मशीनरी, इलेक्ट्रिकल फिटिंगवर पूर्ण सेट आॅफ मिळतो.
७२) आॅफिसमधील उपकरणे, कॉम्प्युटर इत्यादीवर ३ टक्के रिटेंशन असते.
७३) सॉप्टवेअर, बिल्डिंग, पॅसेंजर कारचा सेट आॅफ मिळत नाही.
७४) व्हॅट रिटर्नसोबत टीन नंबरप्रमाणे विक्रीची माहिती म्हणजेच जे १ दाखल करावे लागते.
७५) तसेच टीन नंबर प्रमाणे खरेदीची माहिती म्हणजेच जे २ दाखल करावे लागते.
७६) व्हॅटचा सेट आॅफ रु. ५ लाखांच्या वर असेल तर पुढील वर्षात कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही.
७७) व्यापाराची उलाढाल १ कोटीच्या वर असेल तर व्हॅट आॅडिट अनिवार्य आहे.
७८) व्हॅटचे आॅडिट रिपोर्ट दाखल करावयाची अंतिम तारीख १५ जानेवारी आहे.
७९) व्यापारी ‘डिलर इन्फॉर्मेशन सिस्टम’मधून रिटर्नची व रजिस्ट्रेशनची माहिती तपासू शकतो.
८0) जे १ व जे २चा मिस मॅच रिपोर्ट तपासावा व जुळवून घ्यावा.
८१) रु. ५0 लाखांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या रिटेलरसाठी कंपोझीशन स्कीम आहे.
८२) व्हॅटमध्ये वर्क्स कॉन्ट्रॅक्ट रु. ५ लाखांच्या वर असेल तर टीडीएस करावा लागतो.
८३) नोंदणीकृत व्यक्तीचा २ टक्के नसेल तर ५ टक्के टीडीएस केला जातो.
८४) टीडीएस कापणाऱ्याला रिटर्न वर्ष संपल्यानंतर ३0 जूनपर्यंत दाखल करावे लागते.
प्रोफेशन टॅक्स :
८५) प्रोफेशन टॅक्सचे एम्प्लॉयरचा व एम्प्लॉयीचा असे दोन प्रकार पडतात.
८६) प्रत्येक धंदा किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने त्याचा प्रोफेशन टॅक्स ३0 जूनपर्यंत भरावा.
८७) एम्प्लॉयरला एम्प्लॉयीच्या पगारातून प्रोफेशन टॅक्स वजा करून भरावा लागतो.
८८) जर वार्षिक प्रोफेशन टॅक्स रु. ५0 हजारच्या वर असेल तर मासिक नाही, तर वार्षिक रिटर्न भरावे.
८९) जर वेळेवर प्रोफेशन टॅक्स भरला नाही तर रु. १ हजार लेट फीस भरावी लागते.
९0) पुरुषांचा पगार रु. ७,५00पर्यंत प्रोफेशन टॅक्स लागत नाही.
९१) महिलांचा पगार रु. १0 हजारपर्यंत असल्यास प्रोफेशन टॅक्स लागत नाही.
सेवाकर :
९२) जर रु. १0 लाखांपेक्षा जास्त सर्व्हिसेस दिल्या तर सर्व्हिस टॅक्स लागू होतो.
९३) १ जून २0१५पासून सेवाकराचा दर १४ टक्के झाला आहे.
९४) कंपनी करदात्यांसाठी सेवाकर प्रत्येक महिन्याला भरावा लागतो.
९५) वैयक्तिक, पार्टनरशिप फर्म, एल एल पी करदात्यांसाठी सेवाकर प्रत्येक तीन महिन्यांना भरावा लागतो.
९६) सेवाकर भरायची तारीख ही कालावधी संपल्यानंतर पुढील महिन्याच्या ६ तारखेपर्यंत भरावे लागते.
९७) या तारखेपर्यंत भरला नाही, तर १८ टक्के प्रति वर्षप्रमाणे व्याज भरावे लागते.
९८) जर सेवाकर एक वर्षापासून जास्त दिवस भरला नाही, तर व्याज ३0 टक्के भरावे लागेल.
९९) सेवाकराचे रिटर्न दर सहा महिन्यांनंतर २५ तारखेपर्यंत दाखल करावे लागते.
१00) जर सेवाकर ५0 लाखांच्या वर भरला नाही, तर तुरुंगात जावे
लागेल.

Web Title: 100 things of taxation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.