lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत होणार व्यवसायासाठी कमालीचा आकर्षक देश: अरुण जेटली

भारत होणार व्यवसायासाठी कमालीचा आकर्षक देश: अरुण जेटली

व्यापक प्रमाणातील डिजिटायझेशन तसेच वित्तीय उपक्रम व व्यवसायात येत असलेली नियमितता, यामुळे भारत व्यवसाय करण्यासाठी जगातील एक अत्याधिक आकर्षक देश बनण्यासाठी सिद्ध झाला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:15 AM2017-11-16T00:15:17+5:302017-11-16T00:15:39+5:30

व्यापक प्रमाणातील डिजिटायझेशन तसेच वित्तीय उपक्रम व व्यवसायात येत असलेली नियमितता, यामुळे भारत व्यवसाय करण्यासाठी जगातील एक अत्याधिक आकर्षक देश बनण्यासाठी सिद्ध झाला आहे

 India will be a very attractive country for business: Arun Jaitley | भारत होणार व्यवसायासाठी कमालीचा आकर्षक देश: अरुण जेटली

भारत होणार व्यवसायासाठी कमालीचा आकर्षक देश: अरुण जेटली

सिंगापूर : व्यापक प्रमाणातील डिजिटायझेशन तसेच वित्तीय उपक्रम व व्यवसायात येत असलेली नियमितता, यामुळे भारत व्यवसाय करण्यासाठी जगातील एक अत्याधिक आकर्षक देश बनण्यासाठी सिद्ध झाला आहे, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.
सिंगापूर फिन्टेक फेस्टिव्हलमध्ये बोलताना जेटली यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, भारतातील आधार योजनेमुळे डिजिटायझेशन प्रक्रियेला वेग आला आहे. नोटाबंदीनंतर डिजिटल इको-पेमेंट सिस्टीमवर मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. १ जुलैपासून वस्तू व सेवाकराची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून व्यवसाय करण्यासाठी भारत जगातील अत्याधिक आकर्षक देश होण्यासाठी सिद्ध झाला आहे.
जागतिक बँकेने व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताच्या मानांकात ३० स्थानांची सुधारणा केल्याच्या मुद्द्याकडे जेटली यांनी परिषदेतील उपस्थितांचे लक्ष वेधले. या निर्देशांकात भारत आता १००व्या स्थानी आला आहे. अल्पकालीन पातळीवर भारतासमोर काही आव्हाने आहेत, हे मात्र जेटली यांनी मान्य केले.
जेटली म्हणाले की, अल्पकालीन पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काही आव्हाने आहेत. तथापि, मध्यम आणि दीर्घकालीन पातळीबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. भारतीय अर्थव्यवस्थेकडून चांगलाच परतावा मिळेल.
वित्तमंत्र्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे व्यापक चित्र या कार्यक्रमात उभे केले. त्यांनी म्हटले, भारतीय अर्थव्यवस्था लक्षणीयरीत्या वृद्धी पावत आहे. औपचारिक आणि अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा नीट मेळ घालण्यात आला आहे. रचनात्मक बदल केले जात आहेत. करांचा आधार वाढत आहे. आतापर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेतील बहुतांश आर्थिक व्यवहार रोखीने होत होते. आज डिजिटल व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वित्तीय व्यवहार बँकांमार्फत होत आहेत.
दोन दिवसांच्या सिंगापूर दौºयावर असलेले जेटली हे अनेक नेते, उद्योजक व वरिष्ठ अधिकाºयांच्या भेटी घेणार आहेत. गुरुवारी ते पंतप्रधान ली हसीएन लुंग यांची भेट घेणार आहेत. मॉर्गन स्टॅनलेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक वित्तीय संस्थांच्या आशिया प्रशांत शिखर परिषदेलाही ते हजेरी लावणार आहेत.

Web Title:  India will be a very attractive country for business: Arun Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.