lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटाबंदीनंतरही झाले संशयास्पद व्यवहार, ५८00 कंपन्यांवर सरकारची नजर

नोटाबंदीनंतरही झाले संशयास्पद व्यवहार, ५८00 कंपन्यांवर सरकारची नजर

नोटाबंदीनंतर ५,८00 कंपन्यांनी केलेल्या संशयास्पद व्यवहारांची माहिती १३ बँकांनी सरकारला दिली आहे, असे सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:24 AM2017-10-07T04:24:35+5:302017-10-07T04:24:54+5:30

नोटाबंदीनंतर ५,८00 कंपन्यांनी केलेल्या संशयास्पद व्यवहारांची माहिती १३ बँकांनी सरकारला दिली आहे, असे सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

Government views over suspicious transactions, 5800 companies after no blockade | नोटाबंदीनंतरही झाले संशयास्पद व्यवहार, ५८00 कंपन्यांवर सरकारची नजर

नोटाबंदीनंतरही झाले संशयास्पद व्यवहार, ५८00 कंपन्यांवर सरकारची नजर

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर ५,८00 कंपन्यांनी केलेल्या संशयास्पद व्यवहारांची माहिती १३ बँकांनी सरकारला दिली आहे, असे सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर संशयास्पद व्यवहार करणाºया कंपन्यांनी १३,१४0 बँक खात्यांत ४,५७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती. त्यापैकी ४,५५२ कोटी रुपये लगेचच काढून घेण्यात आले. संशयास्पद व्यवहार करणाºया कंपन्यांची बँकांकडून मिळालेली पहिलीच यादी आहे. यानंतर आणखी माहिती बँकांकडून येईल. २,0९,0३२ संशयास्पद कंपन्यांची नोंदणी सरकारने रद्द केली आहे. त्यांच्या बँक खात्यांवरही बंधने आणण्यात आली आहेत.
बँकांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, संशयास्पद व्यवहार करणाºया अनेक बँकांची १00पेक्षाही अधिक बँक खाती आहेत. एका कंपनीची तर २,१३४ खाती असल्याचे समोर आले आहे. ३00 ते ९00च्यादरम्यान खाती असलेल्या कंपन्यांची संख्या मोठी आहे. नोटाबंदीच्या दिवशी, ८ नोव्हेंबर २0१६ रोजी या कंपन्यांच्या खात्यांवर २२.0६ कोटी रुपये होते. ९ नोव्हेंबरपासून ते त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत या कंपन्यांनी ४,५७३.८७ कोटी रुपये खात्यांवर जमा केले; तसेच ४,५५२ कोटी रुपये काढून घेतले. या कंपन्यांच्या कर्ज खात्यात ८0.७९ कोटी रुपयांचा निगेटिव्ह ओपनिंग बॅलन्स होता.
सरकारच्या असे लक्षात आले आहे की, अनेक बँक खाती असलेल्या कंपन्यांच्या खात्यात ८ नोव्हेंबर २0१६ रोजी निगेटिव्ह बॅलन्स होता. त्यानंतर त्यांनी या खात्यांत कोट्यवधी रुपये भरले आणि काढून घेतले. पैसे काढल्यानंतर ही खाती पुन्हा निष्क्रिय झाली. जोपर्यंत कारवाई झाली नाही, तोपर्यंत या कंपन्या असे व्यवहार करीतच होत्या. काही कंपन्यांनी तर कारवाईनंतरही पैसे जमा करणे आणि काढण्याचे व्यवहार केले.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीच्या दिवशी एका बँकेत
४२९ कंपन्यांची झीरो बॅलन्स खाती होती. नोटाबंदी होताच या बँकांनी या खात्यांत पैसे भरण्याचा सपाटा लावला. त्यांनी ११ कोटी रुपये खात्यांवर भरून काढून घेतले. त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली त्या दिवशी त्यांच्या खात्यावर ४२ हजार रुपये हाते.

Web Title: Government views over suspicious transactions, 5800 companies after no blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.