lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी स्वस्त होणार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील कर होणार कमी

फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी स्वस्त होणार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील कर होणार कमी

नवी दिल्ली : जीएसटी कररचना व्यवहार्य करण्याच्या प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून खाली आणण्यात येणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:52 PM2017-11-20T23:52:22+5:302017-11-20T23:52:47+5:30

नवी दिल्ली : जीएसटी कररचना व्यवहार्य करण्याच्या प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून खाली आणण्यात येणार आहे.

Freezing, washing machines, low cost and non-electronics taxes will be reduced | फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी स्वस्त होणार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील कर होणार कमी

फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी स्वस्त होणार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील कर होणार कमी

नवी दिल्ली : जीएसटी कररचना व्यवहार्य करण्याच्या प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून खाली आणण्यात येणार आहे. त्यामुळे वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर व एअर कंडिशनर (एसी) यांच्या किमती कमी होतील.
जीएसटी परिषदेने १७८ वस्तूंना २८ टक्के करकक्षेतून काढून १८ टक्के करकक्षेत आणले. सामान्य लोकांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचा त्यात समावेश आहे. आता २८ टक्के जीएसटीच्या कक्षेत लक्झरी व तंबाखूसारख्या घातक वस्तूच राहतील, असे संकेत जेटलींच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषदेने दिले आहेत. पुढच्या टप्प्यात टिकाऊ ग्राहक वस्तूंवरील कर कमी करण्याचा विचार आहे. वॉशिंग मशीन व रेफ्रिजरेटर या वस्तूंचा त्यात समावेश होता. त्यावरील कर १८ टक्के करण्यात येईल.
श्वेत वस्तू (व्हाइट गुडस्) या नावाने ओळखल्या जाणाºया या वस्तू महिलांवरील कामाचा बोजा कमी करतात. महिलांना दिलासा देण्यासाठी त्या स्वस्त करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या जीएसटी व्यवस्था चार टप्प्यांची आहे. ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असा चार टप्प्यांत वस्तूंवर कर आकारला जातो. सोने व दागिन्यांवर सवलत म्हणून ३ टक्के, तर हिºयांवर 0.२५ टक्के कर आकारला जातो. रोजच्या वापरातील अत्यावश्यक वस्तू करमुक्त ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंवर शून्य टक्के कर आहे.
>संकेत होतेच
जेटली यांनी करकपातीचे संकेत दिले होते. कर सुलभीकरणाची प्रक्रिया संक्रमणावस्थेत असून, ती सतत सुरूच राहील. जेथे कोठे सुधारणेला आणि सुलभीकरणाला वाव असेल, तेथे तो केला जाईल. भविष्यात २८ टक्के करकक्षेत केवळ लक्झरी वस्तू आणि घातक वस्तूच राहतील. जीएसटी व्यवस्थेची रचना कालांतराने दोनच टप्प्यांची होऊ शकेल, असे जेटली यांनी म्हटले होते.

Web Title: Freezing, washing machines, low cost and non-electronics taxes will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी