lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एफएमसीजी कंपन्यांनी केली किमतीत कपात, कपातीचा लाभ ग्राहकांना

एफएमसीजी कंपन्यांनी केली किमतीत कपात, कपातीचा लाभ ग्राहकांना

नवी दिल्ली : सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर गतिशील ग्राहक वस्तू (एफएमसीजी) क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांनी आपल्या वस्तूंच्या किमतीत कपात केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:38 AM2017-11-23T03:38:04+5:302017-11-23T03:38:32+5:30

नवी दिल्ली : सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर गतिशील ग्राहक वस्तू (एफएमसीजी) क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांनी आपल्या वस्तूंच्या किमतीत कपात केली

FMCG companies cut costs, cut profits to consumers | एफएमसीजी कंपन्यांनी केली किमतीत कपात, कपातीचा लाभ ग्राहकांना

एफएमसीजी कंपन्यांनी केली किमतीत कपात, कपातीचा लाभ ग्राहकांना

नवी दिल्ली : सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर गतिशील ग्राहक वस्तू (एफएमसीजी) क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांनी आपल्या वस्तूंच्या किमतीत कपात केली आहे. आयटीसी, डाबर, एचयूएल, मॅरिको आणि पतंजली या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. अन्य श्रेणीतील वस्तूंच्या किमतीतही लवकरच कपात येणार असल्याचे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले.
जीएसटी दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वस्तूंच्या किमती कमी करण्याचे निर्देश सरकारने कंपन्यांना दिल्यानंतर दुसºयाच दिवशी कंपन्यांकडून हा खुलासा करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून १७८ वस्तूंवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. त्यानुसार किमती कमी करण्याचे निर्देश सरकारने कंपन्यांना दिले होते.
आयटीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, जीएसटी अधिसूचनेनुसार कंपनीने आपल्या सर्वसंबंधित उत्पादनांच्या किमतीत सुधारणा केली आहे. एचयूएलच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्ही ब्रू गोल्ड कॉफीची किंमत १४५ रुपयांवरून १११ रुपये केली आहे. आणखी काही कपात झाल्यास त्याची माहिती दिली जाईल. जीएसटी दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास कंपनी बांधील आहे.
मॅरिकोचे सीएफओ विवेक कर्वे यांनी सांगितले की, कंपनीने डिओडरंटस्, हेअर जेल, हेअर क्रीम्स आणि बॉडीकेअर यासारख्या अनेक वस्तूंच्या किमती कमी केल्या आहेत. नव्याने उत्पादित होणाºया वस्तू नव्या किमतीनुसारच विकल्या जात आहेत. त्याचप्रमाणे जुन्या साठ्यावर स्टिकर्स चिकटवून किमतीत बदल केला जात आहे. कंपनीने वितरक व भागीदारांना किमती कमी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
डाबरने म्हटले की, शाम्पू, स्कीन केअर आणि होमकेअरच्या किमतीत कंपनीने ९ टक्के कपात केली आहे. नव्या व जुन्या अशा दोन्ही साठ्यांवर ही कपात करण्यात आली आहे. पतंजलीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही जीएसटी कपातीचे स्वागत करतो. हा लाभ आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मूल्यमापन करीत आहोत.
>कारवाईचे होते संकेत
केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क बोर्डाच्या चेअरमन वनजा सरना यांनी काल एक पत्र पाठवून किमती कमी करण्याचे निर्देश एफएमसीजी कंपन्यांना दिले होते. किमती कमी करणाºया कंपन्यांविरुद्ध नफाखोरीविरोधी नियमातहत कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले होते.

 

Web Title: FMCG companies cut costs, cut profits to consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.